आदिवासी विद्यार्थ्यांना लागणार शिक्षणाची गोडी, मिळणार पौष्टिक आहार 

चंद्रकांत घोडेकर
शनिवार, 23 मे 2020

आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी घोडेगावजवळ कोटमदरा येथे सेंट्रल किचन उभे राहत आहे. 

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यातील आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी घोडेगावजवळ कोटमदरा येथे सेंट्रल किचन उभे राहत आहे. 

मित्राच्या बर्थडे पार्टीत झिंगाट झालेले थेट पोचले... 

या कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. लवकरच ते सुरू होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, पंचायत समिती सभापती संजय गवारी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते. 

आळंदीच्या वेशीवर कोरोना, अंगणात मात्र चिकुनगुणियाचे थैमान  

या तीन तालुक्‍यात मोठे आदिवासी क्षेत्र आहे. या तिन्ही तालुक्‍यातील विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. या आश्रमशाळा व वसतिगृहांना सध्या ठेकेदार पद्धतीने जेवण व नाष्टा पुरवठा होत आहे. यामध्ये मुलांना चांगले व पौष्टिक जेवण मिळत नाही, अशा स्वरूपाच्या नेहमी तक्रारी होत असतात. त्यासाठी एका ठिकाणी सेंट्रल किचनमध्ये सर्व मुलांचे जेवण तयार करावे आणि ते गाड्यांनी त्या आश्रमशाळेवर व वसतिगृहावर पुरवण्याची योजना आयुष प्रसाद हे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असताना आखली व मंजूर करून घेतली होती. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या सेंट्रल किचनमध्ये आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने पौष्टिक, समतोल व चांगला आहार बनवला जाईल. एकूण पाच हजार विद्यार्थ्यांसाठी सकाळचा नाष्टा नंतर जेवण व संध्याकाळचे जेवण बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे जेवण बनवून शाळा व वसतिगृहांवर पुरवठा करण्याचे काम नारी शक्ती या संस्थेला देण्यात आले आहे. 

या सेंट्रल किचनचे काम जवळ जवळ पूर्ण होत असून, चालू शैक्षणिक वर्षापासून येथून जेवण देता येऊ शकते. सेंट्रल किचनमुळे तक्रारी बंद होऊन मुलांना चांगला व सकस आहार मिळेल, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal students will get nutritious food