
कोथरुड (पुणे) : वाट चुकलेला गवा चुकून शहरात शिरला आणि जीव गमावून बसला. या कोथरुडमध्ये रानवगव्याला कवितेतून भावनिक श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.
''बेगडी व्यवस्था, भुक्कड प्रशासन
गव्याच मरण, कुत्र्यांना संरक्षण
गव्या तुझ्या गुन्हेगारांना, होईल का रे शासन?''
अशा शब्दात कविता करुन वाट कोण चुकले? असा प्रश्न उपस्थित करत सभेत व्यवस्थेतील त्रुटीवर मार्मिक टिपण्णी करण्यात आली. सचिन धनकुठे यांच्या काव्यमय श्रध्दांजलीमुळे वातावरण भावनिक केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोथरुडमध्ये आलेल्या रानगव्याच्या ज्या पध्दतीने मृत्यू झाला ही घटना लाजीरवाणी आणि स्मार्टसीटीची बिरुदे लावणऱ्यां आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. माणुसकी आणि प्राणुसकी म्हणजे प्राण्यांच्या भावना समजून घेणे सुध्दा गरजेचे आहे.
चेंज इंडियाने कोथरुड डेपो येथे आयोजित केलेल्या श्रध्दांजली सभेत महात्मा सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे, विजय बोढेकर, प्रा. सागर शेडगे, भरात गलांडे, अँड. शिवाजी भोईटे, नामदेव ओव्हाळ, मारोती माने, उमेश भेलके, मधुकर दाबके, बी. एच. श्रीकांत, सागर जगताप, आदींनी आपले विचार मांडले. अनुप काळे, संजय मानकर, प्रा शाम धुमाळ, रमेश उभे, आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप कुंबरे यांनी केले.
सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो
''वनसमित्या, जैव विविधता समित्या व मोहल्ला समित्या असल्या तरी त्यांच्या मिटींगा होत नाहीत. त्या कार्यक्षम नाहीत. या समित्यांवर राजकीय व्यक्तींचाच भरणा असतो. अभ्यासू , प्रशिक्षित व वेळ देवू शकणारे लोक अशा समित्यांवर नेमणे आवश्यक आहे. वार्डसभांची अंमलबजावणी महानगरपालिकेने करावी. ''अशी भूमिका या सभेत घेण्यात आली.
महात्मा सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे म्हणाले की, ''वनाधिकाऱ्यांना कळवण्या ऐवजी दूधधंदा करणाऱ्या गवळ्यांना बोलावले असते तर कदाचित त्यांनी या गव्याची व्यवस्थित सुटका केली असती असे आता आम्हाला वाटत आहे. गव्याला आपण न्याय देवू शकलो नाही, परंतु पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य उपाय योजना केल्या जाव्यात. हा रानगवा ताम्हीणी वा महाबळेश्वरमार्गे आला म्हणतात. परंतु, हे अंतर पाहता तो एका दिवसात एवढ्या लांब येणे शक्य नाही. वाटेवरील गावांमध्ये असा गवा कोठे दिसल्याची चर्चा ऐकिवात नाही. त्यामुळे या घटनेत काही काळेबेरे आहे का याची चौकशी करावी.
लॉकडाउनच्या काळात गीर गाईच्या दुधाला दुप्पट मागणी वाढली
विजय बोढेकर यांनी आपले कोकणातील अनुभव सांगत शेतकरी, धनगर समाज व वन्यप्राणी यांच्यातील परस्पर संबंधांची उदाहरणे दिली. ''जरी वन्यप्राणी लोकवस्तीत आला तरी थाळ्या वाजवून त्याला लोकवस्तीतून रानाकडे पिटाळले जाते. खाद्य,'पाणी याच्या शोधात प्राणी लोकवस्तीकडे येतात. त्यांच्या भावना समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आपण पाळायला हवी.''
साई एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. सागर शेडगे म्हणाले की, ''रस्त्यावर भटकणाऱ्या गाईंचे संगोपन करण्याची जबाबदारी आम्ही घेवू''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.