esakal | भारती विद्यापीठ परिसरांत मोकाट जनावरांचा त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

जनानारांचा त्रास

भारती विद्यापीठ परिसरांत मोकाट जनावरांचा त्रास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज : भारती विद्यापीठ परिसरांतील रस्त्यांवर मोकाट जनानारांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्रिमुर्ती चौक ते दत्तनगर रस्त्यांवर तर आधीच वाहतूक कोंडी असते. त्यात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणांवर वाहतूक कोंडी होत आहे.

मोकाट जनांवरांमध्ये बैल, गायी आणि त्यांच्या लहान वासरांचा समावेश आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध चालतात. वाहनचालकांनी हॉर्न वाजवला तरीही जनावरे रस्ता सोडून बाजूला जात नसल्याने नागरिक हैराण आहेत. मोकाट जनावरांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अनेकदा पीएमपीएल बसही अडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याकडे महापालिकेने लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: Pune : लष्करी इतिहास लेखनाची संधी अभिमानास्पद; कुलगुरू डॉ. करमळकर

मोकाट जनावरांचा वावर या परिसरात रोजचाच आहे. त्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होतो. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होते. त्याचबरोबर, जनावरांमुळे रस्त्यांवर घाणही होत आहे. - निलेश कोकणे, स्थानिक नागरिक

हेही वाचा: वारजे : अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

आठवड्यातील दोन दिवस त्या भागात कोंढवडा विभागाची गाडी जाते. त्या परिसरात कारवाईही करण्यात आलेली आहे. मात्र, आता पुन्हा सलग दोन ते तीन दिवस गाडी पाठवून त्या भागातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल. - मारुती हनमघर, आरोग्य निरिक्षक, महापालिका कोंढवडा विभाग.

loading image
go to top