TRTI Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा; टीआरटीआय प्रशिक्षण सुरू करण्यास सरकारची तत्परता, हजारो विद्यार्थ्यांना दिलासा!

Government action on TRTI training delay issue Maharashtra: लालफितशाहीला चाप, रखडलेले स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मार्गी; सरकारी हस्तक्षेपामुळे टीआरटीआयच्या निर्णयप्रक्रियेला वेग, आदिवासी विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा
After Bureaucratic Delay, TRTI Exam Coaching Restarts Across Maharashtra

After Bureaucratic Delay, TRTI Exam Coaching Restarts Across Maharashtra

sakal

Updated on

पुणे : ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (टीआरटीआय) लालफितशाहीमुळे आणि ढिसाळ कारभारामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अखेर सुरू झाले. ‘सकाळ’ने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर राज्य सरकार आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी याची तातडीने दखल घेतली. सरकारच्या निर्देशानंतर ‘टीआरटीआय’ प्रशासनाला जाग आली असून, प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून सोमवारपासून (ता. ४) प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com