esakal | पुण्यासाठी 25 हजार डोस उपलब्ध; आज १९१ ठिकाणी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

पुण्यासाठी 25 हजार डोस उपलब्ध; आज १९१ ठिकाणी लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शासनाकडून महापालिकेला २५ हजार डोस मिळाले असल्याने गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेले लसीकरण उद्या (ता. २२) होणार आहे. १८५ ठिकाणी कोव्हीशील्ड आणि ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण होणार आहे. आॅनलाइन बुकिंग गुरुवारी सकाळी आठला सुरू होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

बुधवारी महापालिकेला शासनाकडून २१ हजार कोव्हीशील्ड आणि चार हजार कोव्हॅक्सीनचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे लसीची वाट पाहात असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महापालिकेचे कोव्हीशिल्ड लसीचे जवळपास २०० केंद्र आहेत. आज मिळालेल्या डोसमधून काही लस ही विशेष मोहिमेसाठी राखीव ठेवावी लागते, उर्वरित लस प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० डोस दिले आहेत. त्यामुळे महापालिकेकडील २१ हजार पैकी १८ हजार ४०० डोसेसचे वितरण झाल्याने ही लस केवळ एकच दिवसासाठी पुरेशी आहे. गुरुवारी शासनाकडून लस उपलब्ध न झाल्यास शुक्रवारी कोव्हीशील्डचे लसीकरण बंद राहण्याची शक्यता आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : घाटमाथ्यावर अति मुसळधार तर शहरात मध्यम पावसाची शक्यता

कोव्हीशील्ड

  • पहिल्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे

  • पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

  • पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२८ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस |ऑनलाइन

  • थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

  • ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस

  • पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

  • पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

  • २३ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

  • दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

हेही वाचा: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले ७४५ कोरोना रुग्ण

loading image