Pune : T20 वर्ल्डकप वर बेटिंग करणारे दोघे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 वर्ल्डकप वर बेटिंग करणारे दोघे जेरबंद

Pune : T20 वर्ल्डकप वर बेटिंग करणारे दोघे जेरबंद

कॅन्टोन्मेंट : २०-२० कोंढवा रोडवरील बिबवेवाडीतील अपार्टमेंटमध्ये वर्ल्ड कप फायनल २०२१ ऑनलाइन क्रिकेट बेटिंग करणाऱ्या दोघांना अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागातील गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: 'राहुल गांधी ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?'

ओंकार राजू समुद्रे (वय २५, रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. विष्णू विहार अपार्टमेंट, बिबवेवाडी, कोंढवा रोड, पुणे), निकित अजित बोथरा (वय २६, रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. भिमाली कॉम्प्लेक्सजवळ सॅलिसबरी पार्क, रोझ अपार्टमेंट)

पोलिसांनी सांगितले की, कोंढवा रोडवरील बिबवेवाडीतील विष्णू-विहार अपार्टमेंटमध्ये ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, लॅपटॉप असा एकूण चार लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा: IND vs NZ : "आता विराट संघात काय करणार?"; रोहितने दिलं उत्तर

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, महिला पोलीस अंमलदार शिंदे, पुकाळे, माने, मोहिते, कांबळे, चव्हाण, कोळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top