
कोरेगाव पार्कमध्ये पेट्रोल पंप जंक्शन आहे. याच ठिकाणी रोशनी पेट्रोल सर्व्हिस स्टेशन नावाचा एक पेट्रोल पंप आहे.रविवारी दुपारी कोरेगाव पार्क परिसरात नेहमीच्या तुलनेत कमी वर्दळ होती. दुपारी पावणे चार वाजले. त्यावेळी दुचाकीवर आलेले दोघेजण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले.
पुणे : ...आणि पेट्रोल पंपावर चोरी करण्याचा त्यांचा 'प्लॅन' फसला !
पुणे : रविवारी दुपारी कोरेगाव पार्कमधील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडील रोकड पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा प्लॅन पुरेसा फसला. दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने कर्मचाऱ्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने हिसकावून पलायन केले खरे, पण त्याचा दुचाकीवरील बेसावध साथीदार कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडला, त्यास पोलिसी खाक्या मिळताच रोकड पळविणाराही काही तासातच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम
कोरेगाव पार्कमध्ये पेट्रोल पंप जंक्शन आहे. याच ठिकाणी रोशनी पेट्रोल सर्व्हिस स्टेशन नावाचा एक पेट्रोल पंप आहे.रविवारी दुपारी कोरेगाव पार्क परिसरात नेहमीच्या तुलनेत कमी वर्दळ होती. दुपारी पावणे चार वाजले. त्यावेळी दुचाकीवर आलेले दोघेजण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले. त्यावेळी दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला व्यक्ती पंपावरील कर्मचाऱ्याशी गप्पा मारत त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. संबंधीत तरुण जरा जास्तच लगट करत असल्याचे पाहून कर्मचाऱ्याने सावधपणे प्रतिसाद दिला. परंतु तो तरुण कुठलीतरी ओळख सांगून कर्मचाऱ्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. कर्मचाऱ्याने त्यास दूर थांबण्याचा सल्लाही दिला. मात्र तो थेट कर्मचाऱ्याच्या पाया पडू लागला. तेवढ्यातच त्याने संधी साधून कर्मचाऱ्याच्या खिशातील रोकड घेऊन तेथून पळ काढला.
करु का अजितदादांना फोन; प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण
दरम्यान, तेथेच दुचाकीवर उभा असणारा त्याचा साथीदार मात्र बेसावध होता. त्याने गाडी सुरू करुन पळ काढेपर्यंत कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घालून त्यास पकडले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोरेगाव पार्क पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पकडलेल्या दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यावेळी त्याने त्या दोघांचा पेट्रोल पंपाचे पैसे चोरण्याचा डाव असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक रुपेश चाळके यांनी तत्काळ आरोपीचा ठावठिकाणा घेऊन रात्री नऊ वाजता पैसे घेऊन पळालेल्या चोरट्यास लक्ष्मीनगर येथे सापळा रचून बेड्या ठोकल्या. माजिद अकबर शेख व वृषभ बाबा पिसे (दोघेही रा.येरवडा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
Web Title: Two Arrested Police Theft Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..