पुणे : पार्टीत भेटलेले मित्र ताब्यात पण, तरुणीच्या खुनाचे गूढ कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • तरुणीच्या खून प्रकरणी दोघे ताब्यात 
  • माणिकबाग येथील प्रकार
  • खुनाचा गुन्हा दाखल पण निष्कर्ष निघेना 

पुणे : माणिकबाग येथे आढळलेल्या तरुणीच्या मृतदेह प्रकरणी बुधवारी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29, रा. फ्लॅट न.15) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवार (ता.2) रोजी दुपारी दोन ते तीन वाजनेचे सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही तरुण तिला एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यांच्याशी परियच झाल्यानंतर त्यांचा संपर्क वाढला होता.

सिंचन प्रकल्पाचे ग्रहण अजित पवारांच्या नाहीतर फडणवीसांच्या मागे

घटनेच्या दिवशी पार्टी केल्यानंतर संबंधित तरुण घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. घटनेच्या दिवशीही त्यांनी घरात पार्टी केल्याचे आढळून आले. मद्याच्या बाटल्या, हुक्का आदी सामग्री पोलिसांना तेथे सापडली होती. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा नोंदवला असता तरी पोलिस खून की आत्महत्या निष्कर्षाप्रत अजूनही पोचलेले नाहीत.

पिंपरीच्या स्थायी सभेत गोंधळ

गळ्यावर दाब दिल्याने श्‍वासोश्‍वास बंद होऊन तेजसा हिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटले आहे. तसेच तिच्या अंगावर जखमा होत्या. यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा तातडीने दाखल केला. परंतु तपासात वेगळी माहिती मिळत असल्याने तसेच शवविच्छेदन अहवालानुसार खूणच झाला असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही. यामुळे पोलिस रात्री उशिरापर्यंत आरोपींची चौकशी करत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested in Tejasa payal Murder case in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: