नारायणगाव परिसरात प्राण्यांचे मांस व टेम्पो जप्त

रवींद्र पाटे
Thursday, 28 January 2021

बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गावर दोन जणांना अटक केली आहे.

नारायणगाव : बंदी असताना गाय व बैल या प्राण्यांची कत्तल करून  बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गावर दोन जणांना अटक केली आहे.

'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

आरोपींकडून एक हजार आठशे किलोग्रॅम मांस व टेम्पो असा आठ लाख चोवीस रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या प्रकरणी टेम्पो चालक राजु आनंदा गोसावी (वय ३४, राहणार सुभेदार वस्ती, ता.श्रीरामपुर, जिल्हा नगर), रिझवान मलंग कुरेशी (वय ३०  राहणार वस्ती मैदान, करामत अली रोड, ख्वाजा चाळ कुरेशी नगर कुर्ली इस्ट, संगमनेर) यांना अटक केली आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

या बाबत सहायक पोलीस निरीक्षक  गुंड म्हणाले, ''आरोपी हे येथील पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधtन मांस घेऊन संगमनेर बाजूकडून पुणे येथे निघाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वारूळवाडी येथील पुणे-नाशिक महामार्गावर तपासणी केली असता टेम्पो (एमएच ०३ सी व्ही ०११०) मध्ये एक हजार आठशे किलोग्रॅम मांस आढळून आले. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार हे मांस गाई व बैलांचे असल्याचे निष्पन्न झाले.

भाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक...

पशुसंवर्धन विभागाची परवानगी नसताना गोवंश कापणे, वाहतूक करणे या साठी बंदी असताना गाई व बैलांची बेकायदेशीररित्या कत्तल करून मांस वाहतूक केल्याप्रकरणी पशु परीक्षण अधिनियम १९४८ चे कलम ५ (क),महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ९ (अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणी  समाजसेवक शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७, राहणार रेव्हेन्यु कॉलनी, शिवाजी नगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested at warulwadi