esakal | पाटस येथे घरात आढळला आई-मुलाचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पाटस येथे घरात आढळला आई-मुलाचा मृतदेह

sakal_logo
By
अमर परदेशी, वरवंड

पाटस ःपाटस (ता. दौंड) येथे घरात आईसह सात वर्षाच्या मुलाचा छताला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता.२७) सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघड झाला. लिना सचिन सोनवणे (वय ३५) व ओम सचिन सोनवणे (वय ७) (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. सदर आत्महत्या आहे का हत्या या बाबत नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही हत्या आहे, असा संशय नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

लिना सोनवणे या आपला मुलगा ओम व मुलगी वैष्णवी यांच्या सोबत पाटस येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. सकाळी साडेसहा वाजता मुलगी वैष्णवी झोपेतून उठली. त्यावेळी तिला आई लिना व भाऊ ओम हे छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत निर्दशनास आले. तिने फोन करुन तत्काळ जवळच्या नातेवाईकांना सांगितले. त्यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन नागरगोजे, उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, साहय्यक पोलिस फौजदार सागर चव्हाण, हवालदार प्रदिप काळे, पोलिस नाईक विजय भापकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घराची सर्वत्र बारकाईने पाहणी केली. या घटने बाबत आत्महत्या कि हत्या असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र,पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होइल असे सांगितले.

हेही वाचा: पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

loading image