esakal | वरवंड येथे कोरोनाने सख्या भावांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

covid19
वरवंड येथे कोरोनाने सख्या भावांचा मृत्यू
sakal_logo
By
अमर परदेशी, वरवंड

वरवंड ःवरवंड (ता. दौंड) येथे कोरोना संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुणाजी रणधीर व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन रणधीर या सख्या भावांचा दहा दिवसांच्या फरकाने मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. माजी सरपंच गुणाजी रणधीर (वय ५८) यांची कोरोना संसर्गाशी सुरु असलेली मृत्यृशी झुंज गुरुवारी (ता. २९) रात्री अपय़शी ठरली. दरम्यान, अंदाजे दहा दिवसांपुर्वी गुणाजी यांचे थोरले बंधू ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन रणधीर (वय ६९) यांचाही कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली.

हेही वाचा: कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान

परीसरात मागील काही महीन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख बेलगाम झाला आहे. कोरोना संसर्गाचा कौंटुबिक प्रसार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक कुटुंबातील सदस्य कोरोना बाधीत झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येने ग्रामपंचायत व आरोग्य विभागही हादरले आहे. गावात मृत्यूदर वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण परसले आहे. मागील पंधरा दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुणाजी धोंडीबा रणधीर यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना वरवंड येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना जास्त त्रास होवू लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना हॅास्पिटलमध्ये हलविण्यात आले. याच दरम्यान, कुटुंबातील त्यांचे थोरले बंधू ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन रणधीर यांनाही कोरोनाची बाधा झाली. या दोघा भावांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु होते. जनार्दन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३ प्रकल्पांवर काम  सुरू

दहा दिवसानंतर गुरुवारी (ता. २९) रात्री गुणाजी यांची उपचार दरम्यान प्राणज्योत मालळली. गुणाजी यांनी सन २००५ ते २०१० पर्यंत सलग पाच वर्ष सरपंच पद भुषविले. तर त्यांचे बंधू जनार्दन रणधीर सन २०१५ ते २०२० दरम्यान ग्रामपंचायत सदस्य होते. दहा दिवसांच्या फरकाने दोन्ही सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजी सरपंच गुणाजी रणधीर यांचा विनोदी शैलीचा स्वभाव होता. घरातून बाहेर पडताच भेटणाऱ्या लहान थोरांना अगदी वाकुन नमस्कार करण्याची त्यांची शैली अनेकांना परीचीत होती.

हेही वाचा: पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत नऊ हजार जणांना ई-पास