हरिश्चंद्री येथे विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यु

शेतकरी व सहकारी वाचले
Two bulls died due to lightning At Harishchandra
Two bulls died due to lightning At Harishchandra

नसरापूर - हरिश्चंद्री, ता. भोर येथे शेतात भात लावणीसाठी बैलजोडी घेऊन शेतात चिखल करत असताना तेथील विजेच्या खांबा मार्फत विज प्रवाह शेतातील पाण्यात उतरल्याने दोन्ही बैलांचा मृत्यु झाला तर शेतकरी व त्यांचा सहकारी सुदैवाने बचावले विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षा मुळे हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असुन या बाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हरिश्चंद्री येथील शेतकरी रमेश दत्तात्रय वाल्हेकर हे त्यांच्या शेतात भातलावणीसाठी बैलांमार्फत चिखल करत होते त्यासाठी शेतात पाणी तुंबवण्यात आले होते यावेळी शेताच्या बांधावरच असलेल्या विद्युत खांबा मधुन शेतातील पाण्यात विजप्रवाह उतरला यावेली बैल उडी मारु लागल्यावर रमेश वाल्हेकर व त्यांचे सहकारी शेतकरी ज्ञानेश्वर गाडे यांनी काहीतरी झाले आहे हे ओळखुन बैलांजवळ गेले असता त्यांना देखिल विजेचा सौम्य धक्का लागल्यावर पाण्यात विजप्रवाह उतरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बैल जोखडातुन मुक्त करत वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही दोन्ही बैल विजेच्या प्रवाहाने मृत्युमुखी पडले.

याबाबत शेतकरयांनी तेथील स्थानीक वायरमन यांना या बाबत तातडीने माहीती दिल्यावर त्याभागातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला परंतु तो पर्यंत बैलांचे प्राण गेले होते गावचे गावकामगार तलाठी सोनवणे यांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला असुन त्या मध्ये विज खांबा वरील शार्टसर्किट मुळे दोन्ही बैलांचा मृत्यु झाला असुन त्यांची अंदाजे किंमत 1 लाख 80 हजार रुपये असल्याचे म्हंटले आहे स्थानीक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखिल घटनास्थळी भेट दिली व शासनाच्या वतीने या शेतकरयांना मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

विज वितरण कंपनीचे उपअभियंता घाटुळे यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता वाल्हेकर यांच्या शेता शेजारील विद्युत खांबावरील सर्व्हिस वायर ब्रेक झाल्याने खांबा मध्ये विद्युत प्रवाह उतरला त्यामुळे ही दुर्घटना घडली असुन या बाबत अहवाल विद्युत निरीक्षक यांना पाठवला असुन शेतकरयाला जास्ती जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.

गावा मधील सामजिक कार्यकर्ते राम पाचकाळे यांनी या बाबत विज वितरण कंपनीच्या कर्मचारयांनी पावसाळ्या पुर्वी विद्युत वायरला घासणारया झाडांच्या फांद्या तसेच कमकुवत झालेल्या तारा या बाबत पडताळणी न केल्याने ही घटना घडली असुन यास विज वितरण कंपनी पुर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com