
पुणे : आपल्या नातेवाईकांचा मृतदेह समजून दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले, दरम्यान दुसऱ्या मृत व्यक्तीचे नातेवाईक त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान अंत्यसंस्कार झालेल्या मृत महिलेच्या अस्थि ताब्यात घेत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.
Video : नाताळ निमित्त विकएंडला बाहेर पडलेले पुणेकर अडकले कोंडीत
ससुन रुग्णलयात दोन महिलाचे मृतदेह शवगारात ठेवण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री आणण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी एक मृतदेह तेथे उपस्थित असलेल्या हडपसर येथील नातेवाईकांनी शवागारातील कर्मचाऱ्यांकडून मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्यावेळी नातेवाईकांनी मृत महिलेचा चेहरा बघितला नाही. ते सर्वजण मृतदेह घेऊन हडपसर येथे गेले, तेथे त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.
पुण्यात महावितरणचा कारभार; ट्रान्स्फॉर्मरसाठी बिल्डरांकडून हात ओले
दरम्यान, शवागरातील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या महिलेचा मृतदेह बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांकडे सोपविला. त्यावेळी त्यांनी मृतदेह ताब्यात घेताना मृत व्यक्तीचा चेहरा पाहिला. तेव्हा ती मृत व्यक्ती आपली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला व याप्रकरणामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद सुरु झाले. त्यानंतर हडपसर येथे मृतदेह नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. अखेर अंत्यसंस्कार झालेल्या महिलेच्या अस्थि आणून देण्याच्या तडजोडीनंतर या प्रकरणावर पडदा पडला.
पुण्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
''अदला-बदल झालेले मृतदेह ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय विभागात फक्त शवविच्छेदनासाठी आणले नव्हते. ते फक्त शवागारात ठेवण्यासाठी आणले होते. त्यामुळे दोन्हीही मृतदेहांचे शवविच्छेदन केलेले नव्हते. शवागारातील मृतदेह ओळखण्यात पहिल्या आलेल्या नातेवाइकाची चूक झाली. त्यातून मृतदेहाची अदला-बदालीचा प्रकार घडला. त्या बाबत लेखी स्पष्टीकरण नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला केले आहे. मात्र, या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल,'' अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.
पुण्यात समान पाणीपुरवठ्यासाठी फेरनिविदा?
अशी घडली घटना
- दोन्ही मृतदेह शीतगृहात ठेवण्यासाठी ससून रुग्णालयाच्या शवागार ठेवण्यात आले होते.
- सकाळी साडेसात वाजता पहिल्या मृतदेहाचे नातेवाईक आले.
- त्यांनी मृतदेह ओळखताना चूक केली. त्यामुळे दुसऱ्याचा मृतदेह ते घेऊन गेले.
- दुसऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले
- त्यानंतर दुसरा मृतदेह घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी हा आपल्या व्यक्तीचा मृतदेह नसल्याचे सांगितले.
- त्यामुळे मृतदेहाची अदला-बदल झाल्याचे उघड झाले
- आधीच्या नातेवाइकांना संपर्क करेपर्यंत पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात आले होते.
- चूक लक्षात येताच पहिल्या नातेवाइकांनी ससून रुग्णालय प्रशासनाकडे लेखी दिलगिरी व्यक्त केली
- दोन्ही मृतदेहाच्या नातेवाइकांनी या प्रकरणात सामंजस्य दाखवल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
पुण्यात मेट्रो जूनमध्ये धावणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.