esakal | चाकण परिसरातील कोरोना संसर्गाचे वास्तव धक्कादायक!
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

चाकण परिसरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने कोरोना संसर्ग काही कमी होत नाही हे वास्तव आहे. रोज दोन जणांचा मृत्यू होत असून, तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. हे धक्कादायक आहे.

चाकण परिसरातील कोरोना संसर्गाचे वास्तव धक्कादायक!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाकण : चाकण व परिसरातील कोरोना संसर्ग काही कमी होईना असे चित्र सध्या आहे. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. एका दिवसाला वीसच्या पुढे रूग्ण संख्या जात आहे. परिसरात आतापर्यंत दीड हजार रुग्ण सापडले आहेत. 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे. 'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने कोरोना संसर्ग काही कमी होत नाही हे वास्तव आहे. रोज दोन जणांचा मृत्यू होत असून, तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. हे धक्कादायक आहे.

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

चाकण व परिसरातील गावात कोरोना वाढीचे मुख्य कारण रस्त्यावरील व बाजारातील गर्दी हे आहे. नगरपरिषदेने बाजारातील गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याचा बाजार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत नेला. परंतु काही भाजीपाला विक्रेते माणिक चौकात, जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर बेकायदा बसतात. या ठिकाणी विक्रेते, हातगाडीवाले, पथारीरवाले यांची मोठी गर्दी असते.

एकावेळी दोन हजारावर लोकांची गर्दी असते. सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझेशन आदी नियमावली पाळली जात नाही. मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात एकमेकांशी संपर्क होऊन कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहे. सरासरी दोन कोरोनारुग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान ही गर्दी कमी करावी, रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी सांगितले की,रस्त्यावरील बेकायदा बाजार उठविला जाईल. स्वतंत्र जागा दिली तरी लोक बसत नाहीत. शेजारील नाणेकरवाडी ग्रामपंचायतीलाही त्यांनी रस्त्यावरील बाजार उठवावा असे आदेश दिले जातील. रस्त्यावरील गर्दी कमी होण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई केली जाईल.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top