हृदयद्रावक : आंबेगाव तालुक्यात मासे पकडताना मामा-भाच्याचा बुडून मृत्यू

हृदयद्रावक : आंबेगाव तालुक्यात मासे पकडताना मामा-भाच्याचा बुडून मृत्यू

पारगाव : लाखणगाव (ता. आंबेगाव) येथे आज शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास तळ्यात मासे पकडताना मामा-भाच्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मामाचे नाव संजय शिवराम केदारी (वय 32) तसेच भाच्याचे नाव ऋषिकेश विजय काळे (वय 8) आहे. स्थानिक नागरिकांना अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.

लाखणगाव येथे मुळ गाव पहाडदरा येथील आदिवासी ठाकर समाजातील शेतमजूर कुटुंब मागील चार वर्षांपासून परिसरातील शेती आर्धलीने करत आहे. शेतातच पत्र्याचे घर करुन राहत आहेत. आज सकाळी त्यातील चौघेजण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. संजय केदारी यांनी सोबत आठ वर्षाचा भाचा ऋषिकेश काळे यालाही नेले होते .संजय केदारी हे पट्टीचेे पोहणारे होते. त्यांनी पाण्यातील जाळे काढण्यासाठी पाण्यात जाताना भाचा ऋषिकेश यालाही खांद्यावर बसवून नेले.

तळ्याची खोली सुमारे 10 ते 12 फूट खोल आहे. तळ्यामध्ये असलेल्या गाळात संजय यांचा पाय रुतल्याने ते भाचा ऋषीकेश सह पाण्यात बुडू लागले. त्यामुळे तळ्याच्या काठावर असलेल्या इतर दोघांनी आरओरडा केल्यानंतर जवळच्या शेतात काम करत असलेले ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फकिरा धरम व विक्रम राजाराम धरम यांनी तळ्याकडे धाव घेऊन इतर दोन तरुणांच्या मदतीने पाण्यात उड्या मारल्या तब्बल अर्धा तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांनाही बाहेर काढण्यात आले, परंतु त्यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता.

सरपंच प्राजक्ता रोडे, पोलीस पाटील कल्पिता बोराडे यांनी ही 
घटना तात्काळ मंचर पोलीस ठाण्यात कळविली असता पारगाव पोलिस बीट जमादार निलेश खैरे व विठ्ठल वाघ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तहसीलदार रमा जोशी यांनीही घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य जलदगतीने राबविण्याच्या सुचना देऊन स्थानिकांकडून घटनेची माहीती घेतली. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com