esakal | दुर्दैवी घटना! इंदापूरमधील दोन कबड्डीपट्टूंचा कर्नाटकमध्ये अपघाती मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

अपघातामध्ये चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीतील चालकासह सात कबड्डीपट्टू जखमी झाले आहेत.

दुर्दैवी घटना! इंदापूरमधील दोन कबड्डीपट्टूंचा कर्नाटकमध्ये अपघाती मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर (पुणे) : राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कबड्डी स्पर्धा गाजविणाऱ्या इंदापूर तालुक्यातील दोन खेळाडूंचा कर्नाटकमध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामध्ये सोहेल इस्माइल सय्यद (वय २०, रा. कळंब) आणि महादेव बापू आवटे (वय २२, रा. भवानीनगर) या दोन कबड्डीपट्टूंचा मृत्यू झाला. कळंब (ता.इंदापूर) येथील ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराणा प्रताप कबड्डी संघातील खेळाडूंचा देशामध्ये डंका आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील कबड्डीच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

'टेस्ला'ला येणार ‘पाय-कार’चा पर्याय; डॉ. विजय भटकर यांची पुण्यात मोठी घोषणा

कर्नाटकमधील सामन्यामध्ये कळंबच्या संघाने अनेकवेळा बाजी मारली होती. कर्नाटकमध्ये खुल्या गटातील स्पर्धेमध्ये महाराणा कबड्डी संघाचे खेळाडू मंगळवारी (ता.१६) चारचाकी गाडीने कर्नाटकला निघाले होते. बुधवार (ता.१७) रोजी पहाटे विजापूरजवळ चारचाकी गाडी आणि कंटेनरच्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीतील चालकासह सात कबड्डीपट्टू जखमी झाले आहेत. यामध्ये गणेश तानाजी कोळी (वय २१), सिद्धार्थ महेश्‍वर कांबळे (वय २०), संदीप नाना सूर्यंवशी (वय २०), अविष्कार शिवाजी कोळी (वय १८), पृथ्वीराज नारायण शिंदे (वय २०), समीर साजुद्दीन शेख (वय २३) आणि चालक वैभव बापूराव मोहिते (वय २७) हे जखमी झाले आहेत. अपघातामध्ये चारचाकी गाडीचं खूप नुकसान झालं आहे.

हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर रोखायला हवं - PM मोदी

इंदापूर तालुक्यावर शोककळा 
कळंब गाव कबड्डी या खेळासाठी प्रसिद्ध आहे. इंदापूर तालुक्यातील दोन कबड्डीपट्टूंचा अपघाती मृत्यू झाला असून इतर खेळाडू जखमी झाले आहेत. दोघांच्या मृत्यूमुळे इंदापूर तालुक्यावरती  शोककळा पसरली आहे. दोन युवा खेळाडूंना अपघातात गमावल्याने गावाचे मोठे नुकसान झाल्याचे ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम यांनी सांगितले.

पवार कुटुंबीय मदतीला धावले
अपघातानंतर जखमींना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मदत केली आहे. तसेच रुग्णवाहिका ही उपलब्ध करुन दिल्याची माहिती ग्रामीण विकास प्रतिष्ठान अध्यक्ष रामचंद्र कदम यांनी दिली.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image