दिलासादायक बातमी : आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दोन लाख जणांनी कोरोनाला हरवलं!

गजेंद्र बडे 
Sunday, 20 September 2020

शनिवारी (ता.१९) दिवसभरात पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ९८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यातील दोन लाख ३४४ नागरिकांनी कोरोनाला हरवलं आहे. हे सर्वजण कोरोनावर मात करत उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील १९० दिवसांतील ही स्थिती आहे. यानुसार दररोज सरासरी १ हजार ५४ पुणेकर कोरोनामुक्त होत आहेत. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० लाख पुणे शहरात सापडला होता. त्यास शनिवारी (ता.२०) १९० दिवस पूर्ण झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ९ हजार ३७१ जण आहेत.

'जम्बो'ने कामगिरी सुधारली; एकाच दिवशी २८ रुग्णांना दिला डिस्चार्ज!​

शनिवारी (ता.१९) दिवसभरात पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ९८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ६५८ जण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ९८४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९३३, नगरपालिका क्षेत्रात ३२१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ८९ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, दिवसभरात ९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४३ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील २६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १६, नगरपालिका क्षेत्रातील सहा आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन जण आहेत.रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शुक्रवारी (ता.१८) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता.१९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना पाठवलं पत्र; अभ्यासकांनी केल्या 'या' मागण्या​

गेल्या २४ तासांत ३ हजार ७८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार २४८, पिंपरी चिंचवडमधील ९०३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार २४८, नगरपालिका क्षेत्रातील ३२९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ५७ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ३४४  झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ६२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील २०४ जण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh people from Pune district recovered from Corona