

Forest officials at the leopard trap site in Kachalwadi; villagers report two leopards trying to free the caged one.
Sakal
जुन्नर : सावरगाव-काचळवाडी ता.जुन्नर येथे पिंजऱ्यात एक बिबट्या पहाटे जेरबंद झाला आहे. जेरबंद बिबट्याच्या पिंजऱ्याला धडका देत त्याच्या सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न करण्यात येत होता. काचळवाडी ग्रामस्थांनी हे दृश्य पाहिले आहे. यामुळे काचळवाडी परिसरात आणखी दोन बिबट्यांचा वावर असल्याने ग्रामस्थांनी वनविभागाकडे पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.