वायरलेस विभागाला दोन राष्ट्रीय पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

देशातील सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान वापर यासाठी या विभागाला सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुणे - केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिस दलाच्या बिनतारी संदेश विभागाला (वायरलेस) दोन पुरस्कारांनी गौरवले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान वापर यासाठी या विभागाला सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

पानिपत पराभवाचा नाहीतर शौर्याचा इतिहास : गोवारीकर

दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये नागरिकांची सुरक्षितता व आपत्ती प्रतिसाद संस्थांची राष्ट्रीय परिषद झाली. त्यामध्ये विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश, अर्धसैनिक दल यांचे दळणवळण प्रमुख, आपत्ती निवारण दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेमध्ये राज्य पोलिस दलाच्या बिनतारी संदेश विभागाला देशातील सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान वापर हे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्या हस्ते राज्य बिनतारी संदेश विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांनी पुरस्कार स्वीकारले.

फोन टॉपिंग म्हणजे मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम : थोरात

डिजिटल दळणवळण प्रणाली, उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा व डिजिटल रेडिओ ट्रॅकिंग प्रणाली अशा सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्र पोलिस दलाकडून केला जातो. असा वापर करणारे महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. तंत्रज्ञानातील बदलाच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इनोवेशन सेंटरची निर्मिती बिनतारी संदेश विभागाने केली आहे.

विभागातील जे. सी. बोस ई-लर्निंग सेंटर, डिजिटल क्‍लासरुममध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी व इतर राज्यातील पोलिस दलातील २५० पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच राज्य बिनतारी संदेश विभागाच्या मुख्यालयामध्ये आर्यभट्ट हे खुले संग्रहालयही रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून उभारले आहे.

पोलिस दलाचा दुसऱ्यांदा गौरव
मागील वर्षी महाराष्ट्र राज्य पोलिस दलास केंद्र सरकारकडून अतिप्रगत तंत्रज्ञान व क्रिप्टोग्राफीमधील देशपातळीवरील दोन पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यापाठोपाठ सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र पोलिस दलास बिनतारी संदेश विभागाच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two national Award to Wireless Department