Two people from Pune were granted bail before their arrest in Uday Samant's attack case
Two people from Pune were granted bail before their arrest in Uday Samant's attack case sakal

Uday Samant Attack : पुण्यातील दोन शिवसैनिकांना अटकपूर्व जमीन मंजूर

पुणे : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज येथे हल्ला झाला होता, दरम्यान उदय सामंत यांच्या हल्ला प्रकरणात पुण्यातील दोन जणांना अटक पूर्व जमीन मंजूर झाला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे आणि शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांना पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मंगळवारी उदय सामंत यांच्या ताफ्यावर पुण्यातील कात्रज भागात झाला होता या हल्ला याप्रकरणी भरती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई करत ६ जणांना अटक केली होती.

Two people from Pune were granted bail before their arrest in Uday Samant's attack case
संजय पांडेंचा मुक्काम कोठडीतच; जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर असताना शिवसैनिकांनी कात्रज भागात त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. यामध्ये शिवसेना शहरप्रमुखाचा देखील सामावेश होता.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे, यामध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटातील हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यादरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाच्या उभारणीसाठी राज्यभरात दौरे केले जात आहेत. अशाच एका सभेनंतर शिवसैनिकांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता.

Two people from Pune were granted bail before their arrest in Uday Samant's attack case
OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com