esakal | नारायणगावात दोन महिलांचा मृत्यू; कोरोना संसर्ग वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

नारायणगाव,वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत कोरोना साथीचा संसर्ग वाढला असल्याने चिंता व्यक्त होत आहे

नारायणगावात दोन महिलांचा मृत्यू; कोरोना संसर्ग वाढला

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : नारायणगाव,वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत कोरोना साथीचा संसर्ग वाढला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गुरुवारी(ता.२०) सकाळी नारायणगाव, वारुळवाडी परिसरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून नारायणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत रूग्णांची एकूण संख्या १७० झाली आहे.उपचारासाठी पुणे येथे दाखल केलेल्या नारायणगाव येथील दोन महिलांचा(वय ५७) बुधवारी(ता.१९) मृत्यु झाला. या मुळे मागील दिड महिन्यात एकूण मृतांची संख्या आठ झाली आहे. अशी माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

नारायणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या वारुळवाडी,आर्वी, येडगाव, मांजरवाडी, धालेवाडी, धनगरवाडी, हिवरे बुद्रुक, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, ओझर, भोरवाडी आदी तेरा गावात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. या पैकी नारायणगाव, वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत सर्वाधिक ८४ जण कोरोना बाधीत झाले आहेत.

रुग्णसंख्येत रोज वाढ होत असून, साथ आटोक्यात येत नसल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.येथील बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे अनेक गावातील नागरिक व टोमॅटो उपबजारात शेतमाल खरेदी व विक्रीसाठी येणारे व्यापारी,शेतकरी  सोशल डीस्टन्स, मास्क अन्य नियमांचे पालन करत नसल्याने संसर्ग वाढला असल्याचे मत सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केले आहे. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

तपासणी सुरू करणार: सरपंच पाटे म्हणाले नारायणगावात सर्वाधिक साठ रूग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.ग्रामपंचायतिच्या वतीने उद्या पासून ताप, ऑक्सिजनचे प्रमाण आदीची प्रभाग निहाय नागरिकांची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. फॉगिंग करून परिसर निर्जंतुक करण्यात येणार आहे.साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिक व व्यापारी यांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच पाटे व डॉ. गुंजाळ यांनी केले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top