दुर्दैवी! साखरेची पोती वाहणारा ट्रक उलटला; दोन महिलांचा जागीच मृत्यू

Accident_Truck
Accident_Truck

वालचंदनगर (पुणे) : जाचकवस्ती (ता.इंदापूर) येथे बारामती - इंदापूर राज्यमार्गावर साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ट्रक रस्त्याच्या साईडपट्टीवरती घसरल्याने हा अपघात झाला. दोन महिला साखरेच्या पोत्याखाली अडकल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला.

अपघातामध्ये प्रतीक्षा विशाल पात्रे (वय २५, रा. पुणे), कविता बाळासाहेब गायकवाड (वय ३६, रा. सणसर) या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये सविता बापू वाघमारे (वय ४०) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर बारामतीमधील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

सोमवारी (ता.15) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास (एम.एच.१२ एन.एक्स ९०८) ट्रक बारामती-इंदापूर रस्त्याने साखरेची पोती घेऊन भवानीनगर बाजूकडून इंदापूरच्या दिशने चालला होता. जाचकवस्तीजवळ ट्रक साईडपट्टीवरून घसरल्याने रस्त्यावर उलटला. तेव्हा साईडपट्टीवरून चाललेल्या महिला ट्रकखाली सापडल्या. या अपघातामध्ये पात्रे आणि गायकवाड या दोघींचा मृत्यू झाला. साईडपट्टीवरती मुरुम न भरल्याने अपघात  झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

ग्रामसुरक्षा यंत्रणा ठरली फायदेशीर..
अपघाताची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रेणेमुळे सणसर आणि जाचकवस्ती गावातील नागरिकांनी मिळाली. जाचकवस्तीचे सरपंच सुशील पवार, उपसरपंच प्रकाश नेवसे यांच्यासह सुमारे ३०० नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक लकडे, सहाय्यक फौजदार प्रभाकर बनकर यांनी नागरिकांच्या मदतीने पोती हटवून अपघातग्रस्तांना बाहेर काढून पाेलिस जीपमधून दवाखान्याकडे रवाना केले, पण या घटनेत त्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत ट्रकमधील पोती हटविण्याचे काम सुरू होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com