पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; दिवसभरात २ हजारांहून अधिकांना लागण

corona
corona

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विक्राळ रुप घ्यायला सुरवात केल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. सोमवारी (ता.१५) पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात सुमारे २,१८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता ४,४०,२४८ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

कोरोनामुळे गेल्या २४ तासांत १५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९४२८ वर पोचली आहे. मृतांमध्ये पुणे महापालिका हद्दीतील १०, पिंपरी-चिंचवडमधील ४ तर ग्रामीण भागातील एकाचा समावेश आहे. नव्या प्रकरणांपैकी पुणे महापालिका हद्दीत १,०८२ रुग्ण आढळले असून पुणे शहरातील एकूण रुग्णांची संख्या २,१९,२८५ पर्यंत पोहोचली आहे. 

तसेच दिवसभरात जिल्ह्यातील एकूण १,८७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरातील ६७८ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यातील ४०८७७० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. 

दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाच्या रुग्णांवर वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरात एकूण ७२८ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या १,१४,७५४ एवढी झाली आहे. 

सध्या पुणे जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ७९६० एवढी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर १४२५९ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दिवसभरात पुणे शहरातील ७२६६ जणांची चाचणी करण्यात आली आहे. पुण्यात ११९८४ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.  

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली, मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com