esakal | Video : अडीच वर्षाच्या चिमुरडीचा पराक्रम; चार तासांत पार केले कळसूबाई शिखर
sakal

बोलून बातमी शोधा

Video : अडीच वर्षाच्या चिमुरडीचा पराक्रम; चार तासांत पार केले कळसूबाई शिखर

शिखरावर कळसूबाई मातेच्या मंदिरासमोर अर्चना यांनी शिवविचार व्यक्त करून प्रजासत्ताक दिनानिमित्त अर्चना, मुद्रा, पायल खेबडे (वय. १३) व गिर्यारोहक रोहित जाधव यांनी हातात तिरंगा घेऊन कोविड योद्धे व भारतीय जवान यांना मानवंदना दिली. 

Video : अडीच वर्षाच्या चिमुरडीचा पराक्रम; चार तासांत पार केले कळसूबाई शिखर

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील मुद्रा अर्चना प्रशांत करंडे या अडीच वर्षाच्या चिमुरडीने  किल्ले रायगड, शिवनेरी, जंजिरा, हडसर, निमगिरी, पद्मदुर्ग, नारायणगड पाठोपाठ रविवारी (ता. २४) महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच कळसूबाई शिखर चार तासांत पायी सर केले. 

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

कळसूबाई मातेच्या मंदिरासमोर भारदस्त आवाजात शिवगर्जना देत कोविड योद्धे व भारतीय जवान यांना मानवंदना दिली. शिव व्याख्यात्या अर्चना भोर-करंडे यांची मुद्रा कन्या आहे. आईच्या गर्भात असतानाच शिव संस्कार अंगिकारत होती. सातव्या महिन्यातच ती जन्माला आली. आईबरोबरच तिचा सतत प्रवास सुरू असतो. 

आईची व्याख्यानेही ती लक्षपूर्वक ऐकते. व्याख्यान झाल्यानंतर करड्या आवाजात मुद्रा शिवगर्जना करते. मुद्रा अतिशय हुशार कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली एक आगळी वेगळी शिवकन्या आहे. 

शिखरावर कळसूबाई मातेच्या मंदिरासमोर अर्चना यांनी शिवविचार व्यक्त करून प्रजासत्ताक दिनानिमित्त अर्चना, मुद्रा, पायल खेबडे (वय. १३) व गिर्यारोहक रोहित जाधव यांनी हातात तिरंगा घेऊन कोविड योद्धे व भारतीय जवान यांना मानवंदना दिली. 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

कॅमेरा मँन सोमनाथ फंड, मचु शिर्के, गहिणी शिंदे, अमोल जाधव, सुयश घेवारी, प्रशांत करंडे यांचे सहकार्य लाभले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर मुद्राने दिलेली शिवगर्जना सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध होत आहे.  

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​

किल्ले हडसर येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रवेशद्वार सोहळा कार्यक्रमात शिवगर्जना आणि शिवविचार मुद्राने  मांडले. ''भविष्यात मुद्रा प्रसिद्ध शिव व्याख्याती व गिर्यारोहक होईल. असा मला विश्वास आहे. डॉ. अमोल कोल्हे फँन क्लब फेसबुक पेजला मुद्राची शिवगर्जना व्हिडिओला शिवप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image