Hadapsar : 'क्रिकेट खेळताना झाला वाद अन्...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hadapsar : 'क्रिकेट खेळताना झाला वाद अन्...'

Hadapsar : 'क्रिकेट खेळताना झाला वाद अन्...'

उंड्री : क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून पालघनसारख्या हत्याराने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर दोघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना काळेपडळ येथील आरटीओ मैदानाजवळील संयोग कॉलनीतील मंदिराजवळ घडली. याप्रकरणी संजू पटणपल्लू (वय ४०, हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार त्यानुसार विकास जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्कारने सन्मान

पोलिसांनी सांगितले की, क्रिकेट खेळत असताना आरोपीजवळ बॉल गेल्याने वाद झाला, शिवी का दिली असे म्हणत आरोपीने तरुणाला बॅटने मारहाण केली. दुचाकीची देखील तोडफोड केली, तरुणाने घाबरून आपल्या वडिलांना फोन लावून झालेला प्रकार सांगितला. तक्रारदार व त्याचे मित्र अजय खैरे याना बोलावून घेऊन त्यांनी मुलाला का मारहाण केली म्हणून जाब विचारला.

हेही वाचा: राष्ट्रपतींच्या हस्ते शिखरचा सन्मान

त्यावेळी त्यांनादेखील मारहाण केली. खैरे यांनी त्यांना धरण्याचा प्रयत्न केल्यावर पालघन सारख्या हत्याराने त्यांच्यावर मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. व्ही वाडकर पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top