कुकडी नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले; शोध कार्य सुरू

बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील स्मशानभूमीजवळ कुकडी नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
Kukdi River
Kukdi RiverSakal
Summary

बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील स्मशानभूमीजवळ कुकडी नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

- राजेंद्र कणसे

आळेफाटा - बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील स्मशानभूमीजवळ कुकडी नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नुसार बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)येथील अनिल संदीप धुळे (वय वर्षे १७) हा युवक पोहण्यासाठी गेला असता तो बुडु लागला हे पाहून जवळच उभे असलेल्या अमोल संदीप धुळे (वय वर्षे १९) व बापू आनंदा धुळे (वय वर्षे ३५) या दोघांनी पाण्यात उड्या घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. बापू धुळे यांनी अनिल धुळे याला पाण्या बाहेर काढून वाचवले, परंतु अमोल धुळे हा नदीच्या पात्रात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवायला गेले असता पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बापु धुळे व अमोल धुळे पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले आहेत.

घटनास्थळी जुन्नर रेस्क्यु टिम दाखल झाली असुन संध्याकाळी उशीरापर्यंत तपास चालु होता मात्र शोध लागला नाही. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस चालु असल्याने ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी चालु असुन ते सर्व पाणी नदीला येत असुन नदीवर कोणीही पोहायला जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर त्यांचे सहकारी,निमगावसावाचे सर्कल नितीन चौरे,बोरी बुद्रुकच्या तलाठी शितल गर्जे यांनी तत्काळ भेट दिली.पाण्यात बुडत असलेल्या वाचवायला गेलेल्या अमोल धुळे व बापु धुळे यांनी अनील चा जिव वाचवला परंतु स्वताचा जिव वाचवु शकले नसल्याने गावातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com