

Maharashtra Politics: मुंबईत अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी होणार असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून शिवप्रेमींना पडला आहे. यावर अनेकदा प्रश्न उपस्थित करूनही समाधानकारक असं उत्तर दिलं गेलं नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात स्मारकाच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र अजूनही स्मारक झालं नाहीय. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलीय. दिल्लीत शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.