Big Breaking : विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख ठरली; 'यूजीसीने नवी नियमावली केली जाहीर!

Stuents
Stuents

पुणे : कोरोना व्हायरसचे संकट आणि लाॅकडाऊनमुळे देशभरातील विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी व पुढील वर्षाच्या प्रवेशासह वर्ग सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. विद्यापीठांना १ जुलैपासून परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. 

परीक्षा व नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यासाठी 'यूजीसी'ने दोन समित्या नेमल्या होत्या. या समित्यांनी नुकताच त्यांचा अहवाल सादर केला. त्यानंतर बुधवारी नियमावली जाहीर केली. तर प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल हे  १ जून ते १५ जून या कालावधीत पूर्ण करावे. यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत परीक्षा पूर्ण कराव्यात.

तीन तासांची परीक्षा घेण्याऐवजी कमी वेळेची असावी.  लेखी परीक्षा ७० गुणांची तर अंतर्गत मुल्यांकन ३० गुणांचे असावे. एकाच वेळी जास्त विद्यार्थी परीक्षेला न बोलवता, दिवसातून दोन वेळामध्ये परीक्षेचे नियोजन करावे. परीक्षा बहुपर्यायी, ओमर आधारीत, ओपन, प्रकल्प आधारीत अशा प्रकारे घेता, १४ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करावेत. नवीन वर्षाची प्रवेश १ ऑगस्टपासून सुरू करावेत आणि १ सप्टेंबरपासून नवे वर्ष सुरू करावे असे नियमावलीत नमूद केले आहे.

- आम्ही राजस्थानमध्ये अडकलो होतो, पण महाराष्ट्र सरकारने... 
 
यूजीसीने जाहीर केलेल्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :

ऑनलाईन वर्ग - १६ मार्च ते ३१ मे 
प्रोजेक्ट सबमिट - १ जून ते १५ जून
उन्हाळी सुट्टी - १६ जून ते ३० जून
परीक्षा - टर्मिनल सेमिस्टर/इयर - १ जुलै ते १५ जुलै
इंटरमिजिएट सेमिस्टर/इयर - १६ जुलै ते ३१ जुलै
निकाल - टर्मिनल सेमिस्टर/इयर - ३१ जुलै
इंटरमिजिएट सेमिस्टर/इयर - १४ ऑगस्ट

प्रवेश प्रक्रिया - १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
द्वितीय व  तृतीय वर्षाचे वर्ग - १ ऑगस्ट पासून सुरू
प्रथम वर्षाचे वर्ग - १ सप्टेंबर पासून सुरू
प्रथम सत्र परीक्षा - १ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com