पैशांचे व्यवस्थापन शिकविणारी अनोखी कार्यशाळा  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

कुटुंबातील महिला सदस्यांना आणि मुलांना पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, याविषयी योग्य माहिती नसल्याने पैसे असूनदेखील सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर, गुंतवणूक विषयासंबंधी असलेल्या अपुऱ्या माहितीअभावी होणारे ‘मिस सेलिंग’ हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.

पुणे - कुटुंबातील महिला सदस्यांना आणि मुलांना पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, याविषयी योग्य माहिती नसल्याने पैसे असूनदेखील सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर, गुंतवणूक विषयासंबंधी असलेल्या अपुऱ्या माहितीअभावी होणारे ‘मिस सेलिंग’ हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ ने अमेरिकन अॅकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इंडिया (AAFM) तर्फे 'मनी मॅनेजमेंट' अर्थात 'पैशांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे' या विषयासंबंधी एक ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कार्यशाळा संपूर्णपणे नि:शुल्क आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुंतवणूक क्षेत्रात होणाऱ्या 'मिस सेलिंग'बद्दल 'सकाळ मनी’ने अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविले आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून अमेरिकन अॅकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इंडियाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. 

पुणे : गुटखा हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 3.5 कोटींची रोकड अन् 9 जण पोलिसांच्या ताब्यात

'सकाळ मनी' हा या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. प्रामुख्याने, घरातील महिला सदस्यांना आणि मुलांना पैशाच्या योग्य व्यवस्थापनाविषयी माहिती नसते. त्यामुळे ज्यांच्यासाठी काबाडकष्ट करून गुंतवणूक केली जाते, त्यांनाच याविषयीची कल्पना नसल्याने उपलब्ध पैशांचा 'स्मार्ट' वापर करून पैसे वाढविता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत असतो. या पार्श्वभूमीवर 'मनी मॅनेजमेंट' या विषयावर आयोजित कार्यशाळेचे विशेष महत्त्व आहे. ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून कुटुंबातील सर्व सदस्यांना 'मनी मॅनेजमेंट' चे धडे गिरवता येतील.

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला; मित्राच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केला बलात्कार
 
कार्यशाळेचा नि:शुल्क लाभ घेण्यासाठी ७४४७४ ५२३३९ वर ‘व्हॉट्सअप’ मेसेज करावा. 
कार्यशाळेची तारीख - ६ डिसेंबर २०२० 
वेळ : दुपारी १२ ते २.३०

कार्यशाळेत काय शिकणार?

  • मुलांबरोबर पैशाच्या व्यवस्थापनाविषयी काय आणि कसे बोलावे?
  • मुलांमध्ये पैशाच्या योग्य व्यवस्थापनाची सवय कशी विकसित करावी?
  • कमी उत्पन्नात किंवा उत्पन्नात सातत्य नसताना देखील सुखी आयुष्य कसे जगता येईल?
  • आपल्या प्रियजनांवर आर्थिक बाबींमध्ये तडजोड करण्याची वेळ येऊ नये यासाठी काय करावे? 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique workshops teaching money management