'ऑनलाइन'ची अवस्था ना तळ्यात, ना मळ्यात

Online-Exam
Online-Exam

पुणे - सावित्रीबाई फुले विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासंदर्भात महाविद्यालयांना फर्मान सोडले असले तरी या शिक्षणाची अवस्था ‘ना तळ्यात, ना मळ्यात’ अशीच आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या ‘ई कंटेट’चा तुटवडा असून, प्राध्यापकांनाही याबाबत कसलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, त्यामुळे ऑगस्टपासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रभाव पुढील काही महिने असणार आहे. याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक काढून शैक्षणिक आराखडा तयार करण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. यामध्ये १ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे, तर १ ऑगस्टपासून इतर वर्षांचे ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग सुरू करण्याबाबत सांगण्यात आले आहे. 

शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी काही प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत; पण ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना पगार नसल्याने ते कामावर नसल्याने अडचण येत आहे. यातून मार्ग काढण्याचे आव्हान संस्थांसमोर आहे. 

महाविद्यालयांची एकूण संख्या 
९६८ - पुणे विद्यापीठाशी संलग्न 
३४६ - कला, वाणिज्य, विज्ञान 
१०९ - अभियांत्रिकी 
५१३ - इतर
६.९२ लाख विद्यार्थी संख्या

‘ई कंटेंट’ कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण महाविद्यालयांना देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधा महाविद्यालयात निर्माण करण्यासाठी विद्यापीठाकडे अनुदानाची मागणी केली जाणार आहे. द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलल्याने त्यावर कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.
- डॉ. संजय चाकणे, प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय

विद्यापीठाने अद्याप निकाल जाहीर केलेले नाहीत. निकाल लागल्यानंतर ऑनलाइन शिक्षणासाठीची प्रक्रिया सुरू होईल. तसेच विनाअनुदानित महाविद्यालय असल्याने आता प्राध्यापकही उपलब्ध नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याने ‘झूम’सह इतर माध्यमाद्वारे शिक्षण दिले जाईल.
-डॉ. सुनील पवार, प्राचार्य, रत्नाई महाविद्यालय, राजगुरुनगर

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) सर्वेक्षण केले होते. त्यात ३२ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात ऑनलाइन समजत नसल्याचे ७२.९ टक्के मुलांनी सांगितले होते. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने सुविधा दिल्या पाहिजेत. केवळ परिपत्रक काढून जबाबदारी संपणार नाही.
- सिद्धार्थ तेजाळे, विभागप्रमुख, ‘मासू’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com