पुणे - खेड तालुक्यात अवकाळी पावसाने पिके उध्वस्त, कोंबड्या गतप्राण

राजेंद्र लोथे
बुधवार, 18 एप्रिल 2018

चास (पुणे) : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील वाडा तसेच वाळद परिसरात मंगळवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले, सुमारे एक तास झालेल्या तुफान गारपिटीने प्रामुख्याने वाळद परिसरात मोठे नुकसान झाले.

येथील मळूदेवी विद्यालयाचे नवीन इमारतीचे पत्र्याचे छप्पर लोखंडी अँगलसह उखडले जाऊन सुमारे दहा फुटावर पडले तसेच शिंदे यांच्या घरावरील पत्रे कौले उडाली अनेकांची उन्हाळी बाजरीची पिके भुईसपाट झाली. काढलेले कांद्याचे पीक भिजले साठवलेला कांदा भिजला तिफणवाडी येथील कडलग यांच्या पोल्ट्रीतील 86 कोंबड्या वीजेच्या कडकडाटाने भेदरून मरण पावल्या. घटनास्थळी भेट देत पंचायत समितीचे सद्स्य भगवान पोखरकर यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे

Web Title: unseasonable rain in khed damages crops and animals