अकुशल कामगारांनो, तुमच्यासाठी संधी चालून आलीय; पाहा कोणती आहेत ती क्षेत्रे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

युवकांना रोजगार, नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्यांना रोजगार कशा पद्धतीने मिळू शकेल? त्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?

पुणे : लॉकडाउनमुळे सध्या अनेक स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सध्या अनेक कंपन्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा देखील रोजगार हवा आहे. तेथे अकुशल कामगारांना मागणी आहे. त्याठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केले तर त्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळतील, असा विश्वास उत्पादन क्षेत्रातील काही उद्योजकांनी शनिवारी व्यक्त केला.

- पुण्यात लॉकडाऊन कधी सुरू होणार? पोलिस सहआयुक्त म्हणतात...​

युवकांना रोजगार, नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्यांना रोजगार कशा पद्धतीने मिळू शकेल? त्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? याबाबत उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर'ने (एमसीसीआयए) ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते.

'प्रदिती प्रेस पार्ट'चे संचालक दीपक करंदीकर, 'विश्वदीप प्रेस पार्ट लि.' च्या संचालिका अंजली सहस्रबुद्धे, 'डॉली अँड समीर इंजिनियरिंग प्रा. लि.'चे संचालक संदेश सालियन आणि 'नितीन प्रेसिंग'चे संचालक नितीन पेंडसे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मार्गदर्शनही केले.

Big Breaking : पुण्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाची कुठे झाली बदली!

करंदीकर म्हणाले, "आमच्याकडे नोकरीसाठी आलेले सर्वच कर्मचारी प्रशिक्षित असतात असे नाही. मात्र येथून बाहेर पडताना त्यांनी कामाच्या संदर्भात सर्व कौशल्य आत्मसात केलेली असतात. या सर्वात मेहनत आणि जिद्द महत्त्वाची ठरते. सालियन म्हणाले," बेरोजगार असलेल्यांना शिक्षणासह कोणत्या कामाची आवड आहे हेही महत्त्वाचे आहे. सध्या अकुशल कामगारांना देखील भविष्यात चांगल्या संधी आहेत. ज्यांच्याकडे पुरेसे कौशल्य नाही त्यांनी ते वाढायला हवे.

तीन वर्षांनंतर झेडपीत बदल्यांचा मोसम होणार सुरू; प्रक्रियेतून 'यांना' वगळले!​

सहस्रबुद्धे म्हणाल्या, " शिक्षण कोणत्याही क्षेत्रातील असो अनेकांना सध्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. नवीन शिकण्याची आणि काम करण्याची इच्छा असेल तर नोकरी मिळेल. पेंडसे म्हणाले, "मुलभूत कौशल्य असलेल्या कामगारांना देखील उत्पादन क्षेत्रात भविष्य आहे. कोरोनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचं त्यांनी सोनं करायला हवा."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या क्षेत्रात आहेत संधी : 
उत्पादन क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात कामगारांचा तुटवडा आहे. त्यामुळे थ्रीडी मॉडलिंग, देखभाल व दुरुस्ती विभाग, डिझायनिंग, हेल्पर आणि ऑपरेटर यासह उत्पादन क्षेत्रात असलेल्या अनेक कौशल्याधारित कामगारांना सध्या नोकरीच्या संधी आहेत, असे या व्यावसायिकांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unskilled workers have opportunity to prove themselves said entrepreneurs in the manufacturing sector