फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

Upper Tahsildar office blame contractor for Negligence in Phugewadi accident
Upper Tahsildar office blame contractor for Negligence in Phugewadi accident

पिंपरी : फुगेवाडी येथील दुर्घटनेप्रकरणी अप्पर तहसीलदार कार्यालयाने संबंधित ठेकेदारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला असून तसा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. तसेच यापुढे या प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेच्या हद्दीमधील धोकादायक खड्डयांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय कार्यालयाने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी दिले आहेत. 

पुणे : विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनला आग; अनर्थ टळला

फुगेवाडी येथील दुर्घटनेच्या दिवशी बचाव यंत्रणाच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड या देखील उपस्थित होत्या. या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला असून त्या अहवालामध्ये देखील पालिकेच्या ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावले नसल्याचा ठपका ठेवला आहे. 

धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

गायकवाड म्हणाल्या,"फुगेवाडी दुर्घटनेच्या दिवशी संपूर्ण रात्रभर कसे मदतकार्य चालले ? काय गोष्टी घडल्या याची प्राथमिक अहवालात नोंद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीच कारवाई करत पालिकेचा संबंधित मुख्य ठेकेदार, 2 उपठेकेदार, सुपरवायझर आणि पालिकेच्या काही अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत. तसेच दुर्घटनेच्या ठिकाणचा खड्डाही बुजविण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लेखी स्वरुपात यापुढे जी काही मार्गदर्शक तत्वांनुसार त्याची कार्यवाही केली जाईल.'' 

धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

सध्या शहरात विकास कामांसाठी अनेक ठिकाणी कामे चालू आहेत असे सांगून गायकवाड म्हणाल्या, ''त्यातील ठिकाणी कामे चालू आहेत. तर काही ठिकाणी कामे अर्धवट आहेत. तेथे धोकादायक खड्डे देखील आहेत. त्याची माझ्या कार्यक्षेत्रातील दहा तलाठ्यांकडे विचारणा केली आहे. हवेली तालुक्‍यातील समाविष्ट गावांसहीत पालिकेच्या हद्दीतील 30 गावांचा त्यात अंतर्भाव आहे. कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने सुरक्षाविषयक पुरेशी काळजी घेतली किंवा नाही याची पाहणी केली जाईल. तसेच ते जिल्हाधिकारी कार्यालयास निदर्शनास आणले जाईल. या कामांत ठेकेदाराची चूक असते. परंतु, प्रशासन अडचणीत येते. ठेकेदार कामे चालू करतात. परंतु, पालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी विकास कामांवर नीट देखरेख ठेवली पाहिजे. कारण, सर्व विकास कामे त्यांच्या अख्त्यारीत चालतात. बेकायदेशीर उत्खननाचे खड्डे खणले जात असतील तर आम्ही तत्काळ त्या ठिकाणी कारवाई करतोच. परंतु, फुगेवाडी येथील कामात निष्काळजीपणाच झाला आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com