नवे वाचन टाळा, नोट्स वर भर द्या; यूपीएससी टाॅपर नेहा भोसलेंनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स 

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 29 September 2020

-नवे वाचन टाळा, नोट्स वर भर द्या
- मास्क घालून अभ्यासाची सवय करा 
- तेलकट, तिखट पदार्थ टाळून आरोग्याची काळजी घ्या

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी देशभरात होणार आहे. परीक्षेसाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना काय करावे आणि काय करू नये हे विद्यार्थ्यांनी जाणून घेणे खूप आवश्यक आहे. अभ्यासाची पद्धती, रिव्हिजन कसे करावे ? आहार कसा असावा? आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याबाबत ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर झालेल्या 'यूपीएससी' निकालात देशात पंधरावा रँक मिळवणार्या आणि महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या  नेहा भोसले यांनी 'सकाळ'शी संवाद साधताना महत्त्वाच्या टिप्स दिल्या, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडतील. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेवटच्या टप्प्यात अभ्यास कसा करावा? 
-  परीक्षा एकदम तोंडावर आलेल्या असताना विद्यार्थ्यांनी नवीन कोणत्याही गोष्टी वाचण्याच्या किंवा त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा त्यांनी गेले वर्षभर जो अभ्यास केलेला आहे त्याचेच व्यवस्थित रिव्हिजन करणे आवश्यक आहे. यामध्ये विशेषतः राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास या विषयांवर प्राधान्याने लक्ष द्यावे. यावर अनेक प्रश्न विचारले जातात. यापूर्वी काढलेल्या नोट्स, पुस्तकात अंडरलाइन केलेला महत्वाचा भाग वाचन करणे सोपे जाते. त्याप्रमाणे चालू घडामोडीचे रिव्हिजन करण्यासाठी पीपी३६५ नावाचे पीडीएफ फाइल उपलब्ध उपलब्ध आहे. तसेच शंकर यांचे रिपोर्ट अँड एंडायसेस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन याचा प्राधान्याने अभ्यास केला पाहिजे. तसेच प्लेसेस व न्यूज हा भागही महत्त्वाचा आहे आहे. हे साहित्य युट्युब वर उपलब्ध आहे उपलब्ध आहे. नकाशा वाचन या काळात महत्त्वाचे ठरेल. या पद्धतीने अभ्यास केल्यास हक्काचे गुण मिळवता येतील. 

सराव परीक्षांचा अभ्यास करावा का? 
- परीक्षेच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये सराव परीक्षांचा (माॅक टेस्ट) अभ्यास करू करून प्रश्नपत्रिका सोडविण्यात वेळ घालवू नये. त्याऐवजी यापूर्वी सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांमधील ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत, त्यावर प्रकाश टाकणे जास्त महत्त्वाचे ठरेल. अभ्यासातील जो भाग कच्चा आहे त्याचा या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तयारी करता येते. यूपीएससीची परीक्षा ही सकाळी व दुपारी या दोन सत्रात होते, परीक्षेच्या वेळेचा विचार करून अभ्यासाचे नियोजन करावे. तसेच सीसॅट पेपर साठी गेल्या तीन-चार वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास प्रश्नांचा पॅटर्न कळू शकतो.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

आहार कसा असावा? 
- परीक्षा एकदम जवळ आलेली असताना आपल्या आहारावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे. तेलकट, तिखट पदार्थ शक्यतो टाळावेत. बाहेरचे पदार्थ न खाता, घरामध्ये बनवलेले अन्न ग्रहण करावे. भरपूर प्रमाणात फळे खाल्ल्यास उत्साह राहील, 
तब्येत व्यवस्थित राहिल तरच पूर्ण क्षमतेने अभ्यास करता येईल. परीक्षा जवळ आली की अनेकांच्या झोपेचे चक्र बिघडते. त्याचा परिणाम तब्येतीवर व अभ्यासावर होतो. त्यामुळे ह्या शेवटच्या काळात व्यवस्थित झोप झाली पाहिजे अशा पद्धतीने वेळा ठरवाव्यात. दिवसा जास्तीत जास्त अभ्यास करावा. रात्री लवकर झोपून सकाळी पुन्हा लवकर उठून अभ्यासाला लागावे यामुळे शरीरावर ताण येणार नाही. अन्यथा परीक्षेच्या दिवशी त्रास होतो. 

कोरोनामुळे येणारा मानसिक दबाव कसा टाळावा? 
- कोरोनाच्या काळात ही पहिलीच परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे दडपण येणे सहाजिक आहे. परीक्षा केंद्रावर दोन तास मास्क घालून पेपर सोडवणे नक्कीच अवघड असेल, पण विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करतानाच जास्त वेळ मास्क घालण्याचा सराव केला पाहिजे. त्यामुळे परीक्षेमध्ये त्याचा त्रास त्यांना होणार नाही. 
परीक्षा केंद्रात जाताना पाण्याची बॉटल घेतली असेल तर, त्यात न विसरता ग्लुकोज टाका त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपण यूपीएससीचा वर्षभर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना आत्मविश्‍वासाने सामोरे गेले पाहिजे. विनाकारण कोणताही दबाव मनावर घेऊ नये. 

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण
 

माहिती अद्ययावत करणारे वाचन करावे का ? 
- परीक्षेसाठी अवघे चार राहिलेले आहेत. परीक्षेचा पेपर यापूर्वीच सेट झालेला आहे, त्यामुळे गेल्या दोन आठवड्यातील घटनांबद्दल प्रश्न विचारले जाणार नसल्याने त्यात वेळ घालू नये. आतापर्यंतचा अनुभव असाच आहे. त्यापेक्षा यापूर्वी काढल्या नोट्स पुस्तकातील महत्त्वाचे पॉईंट या अभ्यासावर भर दिला पाहिजे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास या विषयांवर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त वाचन करणे फायदेशीर ठरेल. विज्ञान व तंत्रज्ञान विषयावर तुलनेने कमी प्रश्न विषयावर तुलनेने कमी प्रश्न विचारले जातात त्याचा काही भाग शिल्लक राहिल्यास तेथे वेळ घालण्यापेक्षा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यास प्राधान्य द्यावे
 

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सहकार व पणन विभागाने दिले आदेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UPSC Topper Neha Bhosale gives important tips