पुणे : ताथवडे उद्यानात आढळला खापरखवल्या साप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

या काळात साप बाहेर पडणे स्वाभाविक असून नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या सर्पमित्राला बोलावून घ्यावे.

पुणे : अवकाळी पावसामुळे जमिनीखालील अनेक सर्प बाहेर येत असतात. असाच एक शहराच्या दृष्टीने दुर्मिळ असलेला खापरखवल्या साप कर्वेनगर येथील शहीद मेजर प्रताप ताथवडे उद्यानात आढळला आहे. धामणपेक्षा अत्यंत संथ गतीने हालचाली करणारा हा साप नितीन कंधारे यांना सापडला. त्यांनी प्राणीमित्र प्रणेती खर्डेकर यांच्याकडे आणले. त्यांनी कंधारे यांच्या मदतीने खापरखवल्या सापाला निसर्गात सोडून दिले.

देहूतील संत तुकोबांचा देऊळवाडा दर्शनासाठी बंद​

खर्डेकर म्हणाल्या, "सदर साप हा बिनविषारी असून पावसाळ्यात आढळतो. खापरखवल्या सापाला युरोपेल्टीस असे शास्त्रीय नाव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आढळल्याने निश्‍चितच ही दुर्मिळ गोष्ट आहे. या काळात साप बाहेर पडणे स्वाभाविक असून नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या सर्पमित्राला बोलावून घ्यावे.'' खर्डेकर यांनी त्या सापाचे छायाचित्र काढले.

Big Breaking: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत​

खापरखवल्या सापाचे वैशिष्ट्य : 
- भारतात आढळणारी बिनविषारी सापाची प्रजाती 
- सामान्यतः जमिनीखाली राहतो. गांडुळ, मुंग्या, कीटकांना खातो. 
- पश्‍चिम घाटात जास्त आढळतो. 
- जमीन भुसभुशीत ठेवणे, मुंग्यांसह जमिनीतील इतर कीटकांची संख्या मर्यादित ठेवणे, नायट्रोजनचे स्थिरिकरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uropeltis Snakes were found in the Tathawade garden at Pune City