Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

Beer Assault : उरुळी कांचन तळवाडी चौकात संतोष उर्फ बुनक्याने दारू पैसे न दिल्याने बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी केला. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.
 Uruli Kanchan  assault case where a man hit another with a beer bottle after a dispute over money for alcohol.

Uruli Kanchan assault case where a man hit another with a beer bottle after a dispute over money for alcohol.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने शिवीगाळ दमदाटी करत बिअरची बाटली डोक्यात मारुन जखमी केल्याची घटना उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात मंगळवारी (ता.०२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी संतोष उर्फ बुनक्या शिंदे (पुर्ण माहीत नाही,रा.श्रीराम पतसंस्थेजवळ,तळवाडी चौक,उरुळी कांचन) याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश विठ्ठल कांचन (वय-२८,रा. आश्रम रोड,गणेश मंदिरासमोर,उरुळी कांचन) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.त्याने दिलेल्या तक्रारीवरून,संतोष उर्फ बुनक्या शिंदे याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Uruli Kanchan  assault case where a man hit another with a beer bottle after a dispute over money for alcohol.
Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com