

‘यूज अँड रियुज’ संस्कृतीची गरज
‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीऐवजी ‘यूज अँड रियुज’ ही पर्यावरणपूरक संस्कृती समाजात रुजवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणावरील ताणही कमी होईल. सध्या निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचा रस्ते बांधकामासह विविध विकासकामांमध्ये पुनर्वापर केल्यास पर्यावरणाला निर्माण झालेला धोका कमी करता येऊ शकतो. अनेक विकसनशील देशांनी प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि पुनर्वापर करून सकारात्मक परिणाम साधले आहेत. त्यामुळे या दिशेने आपणही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. हे केवळ सरकारचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकानेही जबाबदारी स्वीकारून ही सवय अंगीकारणे महत्त्वाचे आहे.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.