लॉकडाऊननंतर ओटीटीचा वापर सर्वाधिक वाढला

OTT
OTT

पुणे - लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक वापरात आलेले मनोरंजन माध्यम म्हणजे ‘ओव्हर दी टॉप’ मिडिया सर्विसेस अर्थात ओटीटी! प्रेक्षकांना मनोरंजनाचे एक खुले माध्यम प्राप्त झाले, पण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील कसदार अभिनेते आणि दर्जेदार संहीतांना एक व्यासपीठ प्राप्त झाले. लॉकडाउनमुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे आदी बंद पडल्यमुळे घरातबसून कुटुंबासोबत मनोरंजनाचा चौरस आनंद देणारे ओटीटी आता प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे वर्षभरात मनोरंजणाच्या माध्यमांमध्ये आणि प्रेक्षकांच्या सवयींमध्ये झालेला बदल पडताळण्यासाठी ‘सकाळ’ने नागरिकांशी संवाद साधला. चोवीस वर्षाची तरूणी हिदा नायर सांगते, ‘टिव्हीवर दाखविण्यात येणारी मालिका ही वर्षानुवर्षे चालते, त्यात कोणतेही तथ्य नसते. मात्र ओटीटीवर विविध प्रकारचा साठा उपलब्ध आहे. त्यावर असलेले वेबसिरीज हे काही भागांचेच असतात व त्यामध्ये समाजातील वास्तविकता मांडली जाते. त्यामुळे ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.’

‘पूर्वी ओटीटीचा वापर जास्त करत नव्हतो. तोणताही नवीन चित्रपट पाहण्यासाठी आम्ही थिएटरला जात होतो. मात्र, लॉकडाऊननंतर ओटीटीचा वापर वाढला आहे. नेटप्लिक्स, ॲमेझॉन सारख्या विविध सबस्क्रिप्शन घेतले आहेत व टिव्हीवर तेच पाहतो. ओटीटीवर फक्त भारतीय नाही तर परदेशातील कंटेन्ट सुद्धा उपलब्ध आहे.’
- राहुल बोकील, ओटीटी वापरकर्ते

नाटक, चित्रपट क्षेत्रावर झालेला परिणाम -
- नव्या चित्रपटांचे, मालिकांचे चित्रीकरण थांबले
- नाट्यगृहे बंद करण्यात झाल्यामुळे अभिनेत्यांसह पडद्यामागचे कलाकार, कामगार बेरोजगार झाले
- या क्षेत्राशी निगडीत असंख्य लोकांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले
- काही मालिका बंद पडल्या
- काही कलाकारांनी अक्षरशः हाताला मिळेल ते काम केले

लॉकडाऊनमध्ये काय झाले ?
- केंद्र सरकारने महाभारत आणि रामायण याचे पुन्ह प्रक्षेपण टिव्हीवर सुरू केले
- शूटिंग बंद असल्यामुळे मालिकांचे उर्वरीत भागांचे चित्रीकरण झाले नाही त्यामुळे ओटीटीचा कल वाढला
- एकूण चित्रपट, वेबसिरिज, मालिका हा मनोरंजनाचा पर्याय सहज उपल्ब्ध झाल्यामुळे नागरिकांची याला पसंती

सद्य परिस्थिती
- लॉकडाऊन नंतर काही प्रमाणात चित्रपटगृहे सुरू झाले असून कोरोनामुळे नागरिकांची चित्रपट गृहांना पाठ
- महिन्याभराचे किंवा वर्षभराचे सबस्क्रिप्शनमुळे मनोरंजनाचा हा पर्याय अजूनही लोकांच्या पसंतीचा
- नवे किंवा जूने चित्रपट ओटीटीवर सहज उपलब्ध असल्यामुळे कधीही कुठेही पाहिले जातात
- घरातही टिव्हीवर ओटीटीच्या माध्यमातून मालिका किंवा चित्रपट पाहण्याची क्रेझ
- टिव्हीचे रिचार्ज मारण्या ऐवजी ओटीटी सबस्क्रिप्शनला प्राधान्य
- इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com