esakal | महाविकास आघाडीतर्फे सोमवारी पुणे बंदचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

pune

महाविकास आघाडीतर्फे सोमवारी पुणे बंदचे आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भाजप नेते, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांच्या धडक देऊन चिरडून मारल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ११) महाविकास आघाडीतर्फे पुणे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: इशान किशनचा झंजावात! केला रोहित, विराटलाही न जमलेला पराक्रम

मिश्रा यांचा मुलगा आशिषवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेस पाच दिवस उलटूनही अजून आशिषला अटक झाली नाही. तसेच हरियानात भाजपच्या खासदाराच्या गाडीने शेतकऱ्यांना उडवल्याचीही घटना घडली आहे. सत्ताधारी पक्षाकडूच अशा घटना घडत असल्याने हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात ११ ऑक्टोबरला पुणे बंद असणार आहे. यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्ष संघटनांची बैठक घेण्यात आली.

हेही वाचा: MI vs SRH हार्दिक पांड्या आउट, पण...

या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार, आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, कमल ढोले, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, माजी महापौर अंकुश काकडे, जनता दल शहराध्यक्ष विठ्ठल सातव, आपचे संयोजक संदेश दिवेकर, राष्ट्र सेवादलाचे पदाधिकारी दत्ता पाकिरे, लोकायतचे नीरज जैन आदी उपस्थित होते.

loading image
go to top