लसीकरणामुळे कोरोनाचा मृत्यूदर 'प्रभावित'; गरीब आणि अस्वच्छ देशांत मृत्यूदर कमी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

नागरिकांमधील आजवरचे लसीकरण आणि जन्मजात रोगप्रतिकार शक्तीमुळे (इनेट इम्युनिटी) दरडोई उत्पन्नात पिछाडीवर असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी राहण्यास मदत झाली आहे, असा निष्कर्ष भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी काढला आहे.

पुणे - नागरिकांमधील आजवरचे लसीकरण आणि जन्मजात रोगप्रतिकार शक्तीमुळे (इनेट इम्युनिटी) दरडोई उत्पन्नात पिछाडीवर असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी राहण्यास मदत झाली आहे, असा निष्कर्ष भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी काढला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब आणि अस्वच्छ देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. यासंबंधीचे संशोधन मेडिकल आर्काईव्ह या प्रकाशनपूर्व शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राच्या डॉ. बिथिका चॅटर्जी, चेन्नई मॅथेमॅटीकल इन्स्टिट्यूटचे डॉ. राजीव करंदीकर आणि ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी हे संशोधन केले आहे.

'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर

असे झाले संशोधन -

  • २९ जूननंतर ६० दिवस, ९० दिवस आणि १२० दिवसांतील कोरोना मृत्यूंचा अभ्यास 
  • प्रती दहा लाख कोरोना बाधितांमागील मृत्यूदराचा लॉगॅरिथमीक पद्धतीने अध्ययन 
  • रुग्णांचे वय, वजन उंचीच्या गुणोत्तराबरोबरच दरडोई उत्पन्न, लोकसंख्येची घनता, लीग गुणोत्तर आदींचे विश्‍लेषण 
  • मधुमेह, स्थूलता आदी जीवनशैलीशी निगडित आजारांसह त्या देशातील संसर्गजन्य आजारांचाही विचार

काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!

संशोधनातील निष्कर्ष 
लोकसंख्याशास्त्रानुसार  

श्रीमंत देशात ६५ वर्षांवरील नागरी लोकसंख्येत लठ्ठपणामुळे कोरोना मृत्यूदर वाढला. लोकसंख्येची घनता आणि लिंगगुणोत्तराचा कोरोनाच्या मृत्यदराशी फारसा सबंध नाही.

निर्जंतुकीकरण
गरीब देशांमध्ये निर्जंतुकी करणाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचे मानले जाते. परंतु, कोरोनाच्या बाबतीत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले निर्जंतुकीकरणच प्रभावी ठरले आहे.

गुऱ्हाळात अडकून पडलेल्या मजुरांची दिवाळी होणार गोड; वेठबिगारीतून प्रशासनाने केली सुटका

संसर्गजन्य आजार 
ज्या देशांमध्ये हिवताप आणि क्षयरोगासह परजीवांपासून होणाऱ्या आजारांवर लसीकरण करण्यात येते. तेथे कोरोनाचा मृत्यूदर तुलनेने कमी असल्याचे दिसते. ‘इम्युनो ट्रेनिंग’मुळे मृत्यूदर कमी होतो.

स्वंय रोगप्रतिकारशक्ती 
बीसीजी लसीकरणाचा कोरोना मृत्यूदराशी फारसा सबंध नाही. ज्यांच्यामध्ये लहानपणी विकसित झालेली रोगप्रतिकारशक्ती आहे अशा कोरोना बाधितांमध्ये तुलनेने मृत्यूदर कमी असल्याचे दिसते. प्रगत देशांमध्ये निर्जंतुकीकरणात राहण्याची सवय होती. त्याचा विपरीत परिणामही दिसला.  

कोरोनाबाबत
१०६ - देशांचा अभ्यास
७० टक्के - मृतांमध्ये श्रीमंत देशांतील प्रमाण
६५ वर्ष - वयापुढे कोरोनातून मृत्यूचा धोका अधिक

अस्वच्छ देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी असला तरी, या देशांनी मायक्रोबायोमास उपचार, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना आणि स्वच्छतेबाबत जागरूकता गरजेचे आहे. 
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, आयसीएमआर.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination reduces coronas mortality in poor and unhygienic countries