व्हॅलेंटाइन्स डेला खुनाचा थरार, संशयी पतीने संपविले सर्वस्व अन्... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मोरचुंद येथे आज सकाळी 7.30 वा दरम्यान पती रमेश महादेव बासुंदे (55) याने पत्नी शोभा रमेश बासुंदे (50) हिचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. शोभा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रमेश बासुंदे हा नेहमीच तिच्याशी वाद घालत होता. यापूर्वी देखील अशाच भांडणातून शोभा ही तिच्या माहेरी झोलंबा येथे वडिलांकडे होती.

वरुड (जि. अमरावती) : सर्वत्र व्हॅलेंटाइन्स डे साजरा होत असताना पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना मोरचुंद येथे आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, पती हा घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला थार (ता. आष्टी, जि. वर्धा) येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. त्याने विष प्राशन केल्याच्या संशयावरून सध्या त्याच्यावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

तालुक्‍यापासून 12 किमी अंतरावरील मोरचुंद येथे आज सकाळी 7.30 वा दरम्यान पती रमेश महादेव बासुंदे (55) याने पत्नी शोभा रमेश बासुंदे (50) हिचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. शोभा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रमेश बासुंदे हा नेहमीच तिच्याशी वाद घालत होता. यापूर्वी देखील अशाच भांडणातून शोभा ही तिच्या माहेरी झोलंबा येथे वडिलांकडे होती.

पोलिस गेले कारवाई करण्यासाठी अन्‌ करावा लागला 'या' गोष्टीचा सामना

पत्नीने न्यायालयात दाखल केले प्रकरण 
सततच्या भांडणामुळे शोभा हिने पती रमेश बासुंदे विरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल केल्याचेही सांगितले जाते. गेल्या तीन चार महिन्यांपूर्वीच ती मोरचुंद येथे आल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. परंतु रमेश बासुंदे हा नेहमीच पत्नी शोभा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांचे वारंवार खटके उडत होते. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास प्रमोद व वामन अशी दोन्ही मुले कामाकरिता घराबाहेर गेले असताना रमेश महादेव बासुंदे याने स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या पत्नी शोभा हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यानंतर पती हा घटनास्थळावरून फरार झाला.

प्यार मे जियेंगे मर जायेंगे... प्रेमकहाणीचा करुण अंत!

घराशेजारील नागरिकांना या घटनेची माहिती प्रमोद व वामन या दोन मुलांना दिली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आल्यावरून वरुडचे ठाणेदार मगन मेहते हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फरतडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतक शोभा हिचा खून करून फरार झालेल्या आरोपी रमेश बासुंदे याच्या शोधासाठी वरुड पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले होते.

विष प्राशन केल्याचा संशय
रमेश बासुंदे हा वर्धा जिल्ह्यातील थार येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसांनी त्याला थार येथून ताब्यात घेतले. मात्र त्याने विष प्राशन केल्याचा संशय आल्याने त्याला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान मृतक शोभा हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

किळसवाणा प्रकार! मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींवर केला अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

या प्रकरणी वासुदेव रमेश बासुंदे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी, संघरक्षक भगत, विजय वागदकर, रवींद्र धानोरकर, सचिन भाकरे, गजानन गिरी आदी तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder on valentine's day amravati