
मनसे मेळाव्याच्या पत्रिकेतून वसंत मोरेंच नावंच गायब; मोरेंची प्रतिक्रिया समोर
पुणे : राज ठाकरे यांच्या तीन सभानंतर भोंग्याच्या प्रश्नावरून राज्यभर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर पुण्यात मनसेकडून महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन भोंग्याच्या आवाजाच्या मर्यादेबद्दल आदेश देण्याची मागणी केली होती. दरम्यान आज मनसेने पुण्यात मेळावा आयोजित केला आहे.
(MNS Vasant More Latest News)
आज पुण्यात मनसेचा मेळावा होणार असून त्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. या कार्यक्रमातून नाव वगळण्यात आल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "रात्री उशीरा माझ्या हातात कार्यक्रम पत्रिका आली. या कार्यक्रम पत्रिकेत ११ जणांची कोअर कमिटी आहे पण प्रत्यक्षात १० जणांची नावं आहेत त्यामध्ये माझं नाव नाही. त्यामुळे मी या मेळ्याव्याला जाणार का नाही याचा निर्णय अजून घेतला नाही." असं ते म्हणाले.
हेही वाचा: "बरं झालं तुम्ही मनसे..."; रोहित पवारांनी वसंत मोरेंच्या कानात सांगितलं
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, "हा विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जात आहेत." अशा शब्दांत आपला रोष व्यक्त करत ते म्हणाले की, "ही गोष्ट अजून मी राज साहेबांपर्यंत पोहचवली नाही पण ही गोष्ट शहरातील सिनिअर लोकांपर्यंत पोहचवली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही." असं म्हणत त्यांनी शहरातील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
काल वसंत मोरे यांना 'पुरंदर प्रतिष्ठान’च्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
हेही वाचा: '...तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते'; नितेश राणेंचा हल्लाबोल
कोअर कमिटीला फक्त माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे, ती खदखद मधल्या आंदोलनात पण दिसली असेल. माझ्या पक्षाची पुण्यात ताकद राहावी हे मला वाटतं पण पक्षात काही पार्ट टाईम काम करणाऱ्यांना ते वाटत नाही." पुण्यातील काही नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करत आता आपल्याकडे राज साहेबांशिवाय कुठलाच मार्ग नाही असं ते म्हणाले आहेत.
Web Title: Vasant More Mns Meeting Name Omit Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..