Vasant More News | मुलाला धमकी मिळाल्यानंतर वसंत मोरे चिडले; म्हणाले, "त्याचा बाप..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More News

मुलाला धमकी मिळाल्यानंतर वसंत मोरे चिडले; म्हणाले, "त्याचा बाप..."

वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला काल अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची घटना घडली. यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. रुपेशच्या गाडीच्या वायपरला कोणीतरी ही चिठ्ठी लावून गेल्याचं वसंत मोरेंनी सांगितलंय. तसंच त्याचा बाप वसंत मोरे आहे, एवढंच लक्षात ठेव, अशी तंबीही त्यांनी पोस्टमधून दिली आहे. (Vasant More Son Rupesh received a threat from unknown person)

हेही वाचा: "सावध राहा रुपेश..."; वसंत मोरेंच्या मुलाला धमकी

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे (Vasant More Facebook Post) म्हणतात, "मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो. आमचेही अगदी तसंच आहे. पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललंच पाहिजे".

सगळा घटनाक्रम आणि पार्श्वभूमीही वसंत मोरे यांनी पोस्टमधून सांगितली आहे. ते म्हणतात, "साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायपर मध्ये "सावध रहा रुपेश" अशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली. तसा तो कोणाच्या अध्यात-मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा?हे का तेच कळत नाही. भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth Police Pune) बाकी तपास करत आहेत. तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत (तात्या) मोरे (MNS leader Vasant More) आहे.!"

Web Title: Vasant More Son Rupesh Threatened By Anonymous Person More Wrote Facebook Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top