esakal | धोनीला करारातून वगळण्याबाबत दादाचे 'नो कमेंट्स प्लीज'!

बोलून बातमी शोधा

Dhoni-Ganguly

धोनीने सप्टेंबर 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मात्र, या वर्षी होणारा टी-20 वर्ल्डकप तो खेळू शकतो.

धोनीला करारातून वगळण्याबाबत दादाचे 'नो कमेंट्स प्लीज'!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या वार्षिक करारातून वगळले. त्यानंतर देशभरातील क्रिकेट फॅन्स कमालीचे नाराज झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल मीडियावर याबाबत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून असे करण्यामागे काय कारण आहे? असे प्रश्न उपस्थित केले. बीसीसीआयने गुरुवारी (ता.16) वार्षिक करारात सामील करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यावेळी या करारामध्ये धोनीचं नाव वगळण्यात आल्याने त्याच्या रिटारयमेंटची घाई इतरांना झाली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

- INDvsAUS : किंग कोहलीच्या नावावर जमा झाले तीन अनोखे कारनामे!

याबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीला विचारणा केली असता यावर त्याने मौन बाळगले. याप्रकरणी कोणतीही वक्तव्य करणे दादाने टाळले. धोनीला वार्षिक करारातून का वगळले आहे, याबाबत मला काही बोलायचे नाही, असे दादा म्हणाला. 

- 'मेडन ओव्हर'चे बादशहा बापू नाडकर्णी काळाच्या पडद्याआड!

बीसीसीआयने धोनीला सेंट्रल करारात घेणे टाळले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. गतवर्षीच्या वनडे वर्ल्डकपनंतर धोनीने एकही सामना खेळला नसून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. त्याने भारतीय सैन्यदलात काही दिवस सेवा बजावली. 

- INDvsAUS : 'कमाल करते हो पांडेजी'; मनिषने एका हातात घेतलेला कॅच एकदा बघाच!

बीसीसीआयने धोनीला ज्या करारातून वगळले आहे तो करार सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 पर्यंतचा आहे. धोनीने सप्टेंबर 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मात्र, या वर्षी होणारा टी-20 वर्ल्डकप तो खेळू शकतो. हा वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे धोनी बीसीसीआयच्या आगामी करारासाठी उपलब्ध असेल आणि तो वर्ल्डकप खेळण्याची शक्यता आहे.