बिबवेवाडी आणि धायरीत किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड-जाळपोळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

बिबवेवाडीतील नीलकमल सोसायटीत घराच्या समोरून जाणा-या रस्त्याच्या वापरावरून किरकोळ वाद झाला होता. या वादातून सोमवारी (ता. 11) पहाटे साडेतीनच्या सुमारास सात ते आठजणांनी एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

पुणे :  किरकोळ वाद, पूर्वी झालेले भांडण तसेच दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटना शहरात अजूनही सुरूच आहे. अशा प्रकारचे दोन गुन्हे बिबवेवाडी आणि धायरी परिसरात घडले आहेत.

बिबवेवाडीतील नीलकमल सोसायटीत घराच्या समोरून जाणा-या रस्त्याच्या वापरावरून किरकोळ वाद झाला होता. या वादातून सोमवारी (ता. 11) पहाटे साडेतीनच्या सुमारास सात ते आठजणांनी एका युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तसेच नीलकमल सोसायटीच्या आवारातील दोन कारच्या काचा फोडण्यात आल्या. याबाबत युवकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून टोळक्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बी. जी. यादव तपास करत आहेत.

एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी अवघ्या 197 विद्यार्थ्यांची नोंदणी  

किरकोळ वादातून एकाने न-हे-धायरी रस्त्यावर असलेल्या वैष्णवी अंगण सोसायटीच्या आवारातील दोन दुचाकी, दोन सायकली पेटवून दिल्या. या प्रकरणी अतुल रवींद्र दांगट (रा. दांगटनगर, शिवणे) याला अटक करण्यात आली आहे. एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. दांगटने केलेल्या जाळपोळीत सोसायटीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणारी वायरिंग जळाली आहे. पोलिस उपनिरीक्षक खेडकर तपास करत आहेत. महर्षीनगर, कात्रज भागात टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता. 11) घडली होती.

शहरात बर्ड फ्ल्यू नाही; महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांची माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle vandalism and arson due to minor dispute in Bibwewadi and Dhayari