वेल्हे प्रशासकीय इमारत जागा निश्चिती येत्या आठ दिवसात : सुप्रिया सुळे

वेल्हे प्रशासकीय इमारत जागा निश्चिती येत्या आठ दिवसात : सुप्रिया सुळे

नसरापूर : वेल्हे तालुक्यातील प्रलंबित प्रशासकीय इमारत, न्यायालय व क्रिडा संकुल या प्रकल्पासाठी जागा पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे येथील आमदार, आधिकारी यांच्या समवेत मी स्वतः बैठक घेवून निश्चित करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे येथील आढावा बैठकीत सांगितले. यावेळी त्यांनी वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थ व प्रशासनाने कोरोना लढाईत केलेल्या कामाचेही त्यांनी कौतूक केले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली वेल्हे तालुक्य.ातील विकास, शेतकरयांच्या समस्या या बाबत आढावा बैठकीचे अयोजन केले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, कृषि अधिकारी धनंजय कोंढाळकर, विज वितरणचे अभियंता शैलेश सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक विनायक देवकर याच्यासह सर्व विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, शंकरराव भुरुक, किरण राऊत, तानाजी मांगडे, आनंद देशमाने, प्रदिप मरळ, संतोष मोरे, शंकर चाळेकर आदी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

बैठकीत कोरोना कार्यकालात उत्कृष्ठ काम बजावणारया आशा व अंगणवाडी सेविकांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. तर चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकरयांची भरपाई बँक खात्यात जमा झाल्याचे पत्र सुळे यांच्या हस्ते देण्यात आले. 

नागरीकांनी समस्या मांडताना गुंजवणी बंद पाईपलाईनमुळे शेतकरयांचे नुकसान, धरणग्रस्त प्रश्न व उर्वरीत पुर्नवसन पुरंदर तालुक्यात व्हावे, वाजेघर व वांगणी भागास धरणाचे पाणी मिळावे, खानापुर रस्ता त्वरीत व्हावा, आस्कवडी येथील पुल रुंदीकरण, धरणग्रस्त अंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी समस्या मांडल्या.

खासदार सुळे यांनी बोलताना गुंजवणी धरणग्रस्तांच्या मागण्या वितरण व्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री, संबधीत सर्व अधिकारी भोर व पुरंदरचे आमदार यांच्या समवेत आठवडाभरात बैठक घेवून योग्य निर्णय घेऊ असे सांगितले. 

वेल्हे प्रशासकीय इमारती बाबत देखिल सर्व संबधितांची बैठक घेवून येत्या 8 दिवसांत जागा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच या आठवड्यात झालेल्या वादळीवारयासह पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील त्वरीत केले जाणार असून, त्यांची नुकसान भरपाई शेतकरयांना मिळणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

कोरोना कार्यकाळात वेल्हे तालुक्यात अत्यंत चांगले काम करुन कोरोना नियंत्रण मिळवले आहे. शासनाच्या 'माझे कुटंब माझी जबाबदारी' या उपक्रमाची दखल देशपातळीवर घेतली गेले असल्याचे सांगून यापुढे देखील योग्य ती काळजी घेवून कोरोनाचा प्रतिबंध करावा, असे अावाहन त्यांनी यावेळी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रणजीत शिवतरे यांनी तालुक्यातील वाजेघर व वांगणी भागाला गुंजवणीचे पाणी मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com