Panshet Leopard : पानशेत भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच; प्रसंधावतेने वृध्द गुराख्याचे प्राण वाचले

Pune Leopard News: टेकपोळे येथील आंब्याचा दांड धनगरवस्ती जवळील जंगलात सायंकाळी एका धष्टपुष्ट बिबट्याने जनावरांवर हल्ला करून जागीच गाईचा फडशा पाडला.
Pune Leopard News
Pune Leopard Newsesakal

वेल्हे, (पुणे) - अतिदुर्गम पानशेत धरण भागात भागात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. टेकपोळे येथील आंब्याचा दांड धनगरवस्ती जवळील जंगलात सायंकाळी एका धष्टपुष्ट बिबट्याने जनावरांवर हल्ला करून जागीच गाईचा फडशा पाडला.

गंगाराम लक्ष्मण ढेबे या वृद्ध गुराख्याने प्रसंगधानता दाखवत तेथुन पळ काढला त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर आंब्याचा दा़ंड धनगर वस्ती आहे. (Marathi Tajya Batmya)

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गंगाराम ढेबे हे जनावरे घेऊन घराकडे निघाले होते. त्यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने जनावरांच्या कळपावर हल्ला केला. कळपातील वासरे, बैल,गाई सैरावैरा पळत सुटली. (Latest Marathi News)

त्यावेळी बिबट्याने एका गाईच्या मानेवर जोरदार हल्ला केला. गाई हंबर्डे फोडत काही क्षणात निपचित पडली. गंगाराम ढेबे यांच्या समोरच बिबट्याने गाईचा फडशा पाडला.गाईची सुटका करण्यासाठी आरडाओरडा करत गंगाराम पुढे आले मात्र बिबट्याचे अक्राळविक्राळ रूप पाहून ते तेथुन धावत घरी आले.

पानशेत वनविभागाचे वनरक्षक एस.बंगाळ म्हणाले, घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात येणार आहे.

तोरणा घिसर पाठोपाठ पानशेत धरण भागातील रायगड जिल्ह्यालगतच्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने गुराखी, शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.

घनदाट जंगलातील दुर्गम भागात घटनास्थळी जाण्यासाठी थेट रस्ते नाहीत तसेच मोबाईल फोनला रेंजही नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग, वनविभागाला मुख्य रस्त्यापासून पाच ते दहा किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे.

वेळेवर पंचनामे, शवविच्छेदन तसेच शासकीय कागदपत्रांची पूर्तता करणे शेतकऱ्यांना गैरसोयीचे होते.त्यामुळे अतिदुर्गम भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने शासन निर्णयानुसार भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com