वेल्हे तालुक्यात ज्येष्ठांचे वय होतंय कमी! आरोग्य विभागात रंगली चर्चा

In Velhe taluka the age of senior citizens is getting lower
In Velhe taluka the age of senior citizens is getting lower
Updated on

वेल्हे : (पुणे) :वेल्हे तालुक्यात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जात आहे. याचा परिणाम आता ज्येष्ठांवर होताना दिसत आहे. प्रशासकीय कर्मचारी तपासणी करताना ज्येष्ठ तरुण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर पडताना दिसत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या सहा महिन्यापासुन सर्वत्र चर्चेचा एकच विषय आहे तो म्हणजे कोरोना. जगामधील आर्थिक प्रगत राष्ट्रांनी या विषाणूपुढे गुडगे टेकले आहेत. भारतात याचा शिरकाव झाला त्याचबरोबर सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात व पुणे शहर जिल्ह्यात सापडु लागली. शहराबरोबरच ग्रामीण भागात रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहेत.  त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले. 

त्यात सरकारने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. लहान मुले व जेष्ठ व्यक्तींची विशेष काळजी घेण्याच्या वारंवार सुचना प्रशासनाकडुन नागरीकांना मिळु लागल्या.याची जबाबदारी प्रशासन सुध्दा घेवु लागल्याने तालुका  प्रशासनाकडुन सर्व गावातील विशेषत: लहान मुले व साठ वर्षावरील सर्व व्यक्ती व जुने आजार असणाऱ्या नागरीकांची तपासणी होऊ लागली.

तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

लहान मुलांच्या काळजीपोटी पालक व जुने आजार असणाऱ्या व्यक्ती स्वत: हुन पुढे येवु लागल्या. परंतु ज्या  जेष्ठ व्यक्ती एस.टी चे अर्धे तिकिटाचा पास मिळण्यासाठी कमी असलेले वय वाढवुन घेताना आटापिटा करताना दिसत होते. त्या व्यक्ती व अनेक इतर जेष्ठ व्यक्ती ज्यांचे वय ६० ते ७० वर्षे वयोगटात आहे. त्या कोरोनाच्या भितीपोटी  गावात सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या टिमला छातीठोक पणे वय ५५ ते ५८ दरम्यान सांगु लागली आहेत. यामुळे जेष्ठ व्यक्तींची वये कमी होऊ लागल्याने वेल्हे तालुक्यात मोठे आश्चर्य़ घडु लागल्याची आरोग्य विभागात चर्चा होऊ लागली आहे.

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com