महायुतीने कष्टकरी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले : मुक्ता टिळक

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 October 2019

स्वारगेट : यापुढील काळात एक कष्टकरी समाजाच्या सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेण्याचे धोरण आम्ही कायम ठेवू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीच्या कसबा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार मुक्ता टिळक यांनी केले.

स्वारगेट : यापुढील काळात एक कष्टकरी समाजाच्या सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेण्याचे धोरण आम्ही कायम ठेवू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीच्या कसबा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार मुक्ता टिळक यांनी केले.

भवानी पेठेत विडी कामगार महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रिपाईचे नगरसेवक व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 'विडी कामगार महिलांच्या मागाण्यांसंदर्भात या सकारात्मक असून यात मार्ग काढण्यात येत आहे. सरकारने महिलांसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. सरकारने महिलांच्या समस्या सोडवण्यात भर दिला आहे,' असे टिळक या वेळी म्हणाल्या.

मुख्यमंत्री म्हणतात, 'नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू'

किमान वेतन पेन्शन आरोग्यसुविधा मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा आदिंच्या माध्यमातून कष्टकरी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यापुढील काळात सर्व नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचे धोरण पक्षाने नुकतेच जाहीर केले आहे. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत ही धोरणे राबवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी हमी मुक्ताताई टिळक यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच....

त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे यावरच आपल्या प्रचारात भर देत आहे. महिला स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबत आपण यापूर्वीच मिशन मोड कार्यक्रम घेतले आहेत. तसेच वाडे पुनर्विकास, रस्ते रुंदी, वाहतूक सुधारणा आणि मेट्रो स्मार्ट सिटी आधी प्रकल्पांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघाचा आपण चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 bjp leader mukta tilak speech kasba constituency