esakal | Vidhan Sabha 2019 : आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, मुख्यमंत्र्यांचे पवारांना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Cm Devendra Fadnavis replied to Sharad pawar on Wrestler Remark

आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही,” असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना यांना टोला लगावला आहे. 

Vidhan Sabha 2019 : आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, मुख्यमंत्र्यांचे पवारांना उत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : ”आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही, आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही,” असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना यांना टोला लगावला आहे. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत, हातवारे करत शरद पवार यांनी बार्शी या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील भाजपा-सेना युतीमधील चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी नांदुरा येथे आयोजित सभेत बोलत होते.

भाजपच्या स्टेजवरचे 90 टक्के नेते पवारसाहेबांनी तयार केलेले

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना या निवडणुकीत काहीही मजा येत नाही कारण आमचे पैलवान तयार आहेत, आखाड्यातही उतरवलं आहे. मात्र समोर कोणीही नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला पवारांनी उत्तर दिलं होतं. “लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत आणि आक्षेपार्ह हातवारे करत पवारांनी बार्शीतल्या सभेत उत्तर दिलं होतं.

लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये पाठवणारा मीच

दरम्यान, मुख्यमंत्री यांनी म्हटले होते, शरद पवारांची अवस्था सध्या शोले चित्रपटातल्या जेलरसारखी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत कुणी प्रतिस्पर्धीच नसल्यानं निवडणुकीला मजा येत नाहीये. एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेले, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असून त्यांच्यासोबत कुणीच नसल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कसे आहात? अच्छे दिन आले का? राहुल गांधींचा प्रश्न

विरोधकच राहिला नसल्याने निवडणूक कोणाशी लढायची असा प्रश्न करत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्याचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच हार मानली आहे. सत्तेवर येणार नसल्याचे विरोधकांनी आधीच मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी कसलीही आश्वासने दिली आहेत. आता ते आम्हाला निवडून द्या प्रत्येकाला ताजमहल बांधून देऊ इतकेच म्हणायचे शिल्लक राहिले आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

समोर कोणी पैलवान नाही, निवडणूक लढायची कोणाशी, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिरपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसची तर अवस्थी इतकी वाईट झाली आहे की, इकडे निवडणूक लागली आहे, आणि त्यांचे नेते बँकॉकला गेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मंदी निश्चित; उत्पन्नाचा पर्याय शोधताय?

या भारतात प्रत्येकाच्या मनात शल्य होतं की काश्मीर आमचं होतं पण त्याला वेगळा दर्जा होता. तिथे तिरंग्यापेक्षा वेगळ्या झेंड्याला मान होता. त्या ठिकाणी 370मुळे काश्मीरमधला व्यक्ती म्हणायचा आम्ही वेगळे आहोत आम्ही भारतीय नाही. त्याठिकाणी वेगळेपणाची भावना तयार झाली होती. पाकिस्तान काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करीत होता मात्र, मोदींना तुम्ही तीनशेच्या वर जागा दिल्या आणि त्यांनी 370 कलम रद्द करुन टाकलं आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला. मोदींनी हे करुन दाखवलं, त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात शक्तीशाली भारत तयार होत आहे. मोदींच्या नेतृत्वात एक शक्तीशाली आणि समृद्ध महाराष्ट्र आपल्याला करायचाय.

पंधरा वर्षांत ज्या राज्यातला शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला होता, अशा महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना 20 हजार कोटीची मदत केली. मात्र, पाच वर्षात युतीच्या सरकारने केलेली मदत ही 50 हजार कोटींची होती. आम्ही राज्यात 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती अजूनही सुरुच आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्याला वर्षाला बाराशे कोटी रुपये दिले जात होते आम्ही 10 हजार कोटी रुपये दिले. जलयुक्तशिवार योजनेतून जवळजवळ 01 लाख 60 हजार शेतकऱ्यांना शेततळी दिली, दीड लाख शेतकऱ्यांना विहीरी दिल्या, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

loading image